झंझावाती पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना रुजवणारे, कोण आहेत संजय राठोड?

मुंबई | पुण्यातील वानवडी येथे पुजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्मह.त्या केली. २३ वर्षीय असलेल्या या तरुणीने रविवारी (ता.७) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्मह.त्या केली आहे. ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

अशातच पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड हे चांगलेच चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट नाव घेत राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने त्यांच्याविषयीच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर चर्चेत आलेले संजय राठोड आहेत तरी कोण? त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत. संजय राठोड यांनी राजकीय कारकीर्दीला काँग्रेसच्या गडामध्येच कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांना यवतमाळचं शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाही मिळाले.

वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे अस्तिव निर्माण केले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा दारुण पराभव केला आणि काँग्रेसच्या गडावर शिवसेनेची सत्ता आणली.

२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. या मतदारसंघातूनही संजय राठोड यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये त्यांचे नाव होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर यांचा पराभव करून राठोड यांनी हॅटट्रिक साधली.

गेल्या २०१९ मध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना राठोड यांनी तब्बल ६० हजारांवर मते घेऊन सलग चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. ते २००४ ते २०१९ या काळात सलगपणे विधानसभेवर निवडून जात आहेत. राठोड यांनी शिवसेनेचा आमदार ते थेट कॅबिनेटमंत्री असा प्रवास केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“वाट कसली बघताय? मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”
पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरण! पंकजा मुंडेंनी केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
पुजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात सेनेच्या मंत्र्याचे कनेक्शन उघड? ‘ती’ क्लिप व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.