आजही शैतान सिंहचे नाव ऐकून थरथर कापतात चिनी सैनिक; वाचा कोण होते ते मेजर?

गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या भारत-चीन सैनिकांच्या झटापटीमुळे आजही तिथले वातावरण तणाव ग्रस्त आहे. या युद्धात अनेकांचा जीव गेला होता. पण भारतीय सैन्यात एक असा जवान होता, ज्याचे नाव चिनी सैनिकांनी आजही ऐकले तरी त्यांचा थरकाप उडतो.

१९६२ मध्ये, भारत-चीन युद्ध दरम्यान आणखी एक युद्ध लढले गेले, ज्याने भारतीय इतिहासात मेजर शैतान सिंह आणि त्याच्या साथीदारांच्या शौर्याची कहाणी जोडली गेली. ही रेझांग लाची लढाई होती, जिथे १२० शूर भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याचे १३०० सैनिक मारले होते.

गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रेजांग ला स्मारकावर पोहोचून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या १२० सैनिकांच्या तुकडीने शत्रूंशी लढून ५९ वर्षे उलटून गेली आहेत, पण ती कथा आजही तितक्याच उत्साहाने सांगितली जाते.

मेजर शैतान सिंह १३ कुमाऊंच्या चार्ली तुकडीचे नेतृत्व करत होते. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांनी भारतीय सैन्याला संख्या आणि शस्त्रास्त्रांच्या प्रमाणात मात देणाऱ्या चिनी सैन्याचा धैर्याने सामना केला. त्यादरम्यान मेजर शैतान सिंग यांना असेही सांगण्यात आले की त्यांची इच्छा असल्यास ते पदावरून माघारही घेऊ शकतात.

असे असतानाही मेजरने त्यांच्या साथीदारांमध्ये उत्साह निर्माण केला आणि त्यांना हुशारीने लढण्याची सूचना केली. त्याचा परिणाम असा झाला की, भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली चिनी सैन्याविरुद्ध जोरदार लढा दिला. मेजर सिंग यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

१८ नोव्हेंबर १९६२ रोजी पहाटे चार वाजले होते आणि चिनी सैन्याच्या सुमारे २००० सैनिकांनी भारताच्य १२० सैनिकांच्या तुकडीवर हल्ला केला. भारतीय सैन्य यावेळी तिथल्या थंडीचाही सामना करत होती. कमी शस्त्रास्त्रे पाहता चिनी सैनिक जेव्हा फायरिंग रेंजवर येतील, तेव्हाच त्यांच्यावर गोळीबार करावा, अशी रणनीती आखण्यात आली होती.

मेजर सिंग यांनी सैनिकांना एका गोळीबारात एका चिनी सैनिकाला मारण्यास सांगितले. या रणनीतीवर काम करत भारतीय लष्कराने चीनच्या सैनिकांना सळो की पळो करुन सोडले होते. शैतान सिंह यांनी सैनिकांमध्ये लढण्याची उर्मी निर्माण केल्यामुळे प्रत्येक जवान देशासाठी प्राणाची चिंता न करताना लढत होता.

सुमारे १८ तास चाललेल्या या युद्धात भारतीय लष्कराचे ११४ जवान शहीद झाले. गोळीबारादरम्यान भारतीय सैनिन्यांनी संदेश दिला की चिनी सैनिक माघार घेताना दिसून येत आहे. मात्र, काही वेळाने चिनी सैन्याने पुन्हा गोळीबार केला. यावेळी झालेल्या भीषण गोळीबार आणि बॉम्बस्फोटात भारतीय लष्कराचे तीन बंकर उद्ध्वस्त झाले.

बॉम्बस्फोटातच शेलचा तुकडा मेजर शैतान सिंग यांच्या हाताला लागला आणि ते जखमी झाले. सहकारी सैनिकांच्या समजूतीला न जुमानता ते लढत राहिला. त्यांनी चिनी सैनिकांशी लढण्यासाठी मशीनगन मागवली आणि त्याचा ट्रिगर पायात बांधला.

तेव्हा जखमी मेजर पायाच्या साहाय्याने शत्रूंवर गोळ्या झाडत होते. मात्र, तोपर्यंत प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. युद्धात उपस्थित असलेले सुभेदार रामचंद्र यादव यांचाही मोठा वाटा होता. मेजरला पाठीवर बांधून ते बर्फातून जाऊन एका दगडाच्या बाजूला त्यांना घेऊन गेले. काही वेळाने तिथे मेजरने जगाचा निरोप घेतला. या युद्धात ११४ भारतीय जवान शहीद झाले, तर ५ जणांना युद्धकैदी बनवण्यात आले होते, पण भारताने सुमारे १३०० चिनी सैनिकांनाही त्यावेळी मारले होते.

महत्वाच्या बातम्या-
२०१४ मध्ये शिवसेनेनेही म्हटले होते ‘देश स्वतंत्र झाला’, भाजपने पुरावा दिल्याने शिवसेना तोंडावर आपटली
‘मुंबईमध्ये वानखेडेंचे बार आहेत, त्यांची नोकरी जाणार हे आता निश्चित झाले आहे’
‘शेतकऱ्यांना चिरडून मारले याला जबाबदार कोण? त्यांना देशद्रोही, म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.