विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर कोण होणार पुढील कर्णधार? या तीन नावांची जोरदार चर्चा

विराट कोहलीने भारताचे टी 20 कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर आपल्या आणखी एका मोठ्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कोहलीने आता आयपीएलमधील आरसीबी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या आयपीएल हंगामानंतर विराट कोहली आरसीबीचे कर्णधारपदही सोडेल. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने एका आठवड्यात दोन संघांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवड्यात, विराटने टी 20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आणि 19 सप्टेंबर (रविवारी) त्याने आयपीएल 2021 नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) कर्णधारपदावरून निवृत्ती जाहीर केली.

हे 3 खेळाडू RCB चे कर्णधार होऊ शकतात
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने विराट कोहलीचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी सांगितले की 2021 चा IPL हा कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा हंगाम असेल.

विराट 7 वर्षे आरसीबीचा कर्णधार आहे, पण त्याच्या नेतृत्वाखाली या फ्रँचायझी संघाने आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही. विराट कोहलीचे कर्णधारपद सोडल्यानंतर असे 3 खेळाडू आहेत जे RCB चे कर्णधार बनू शकतात.

एबी डिव्हिलियर्स
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स पुढील हंगामात आरसीबीचे कर्णधार होऊ शकतो. एबी डिव्हिलियर्स आता 37 वर्षांचा आहे, पण त्याची स्फोटक फलंदाजी पाहून तो 27 वर्षांचा दिसतो.

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला 2015 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नेले. विराट कोहलीनंतर एबी डिव्हिलियर्स आरसीबीचे अधिक चांगले नेतृत्व करू शकतो. विराट नंतर आरसीबीमध्ये एबीचेच चाहते सर्वात जास्त आहेत.

ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा या वर्षी आरसीबी संघात समावेश करण्यात आला होता, जेणेकरून डिव्हिलियर्ससह आणखी एक स्फोटक फलंदाज घेऊन संघाला बळकटी मिळेल. ग्लेन मॅक्सवेलने यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले आहे.

ग्लेन मॅक्सवेलला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. मॅक्सवेलने या आयपीएल हंगामात आरसीबीसाठी 144.8 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 223 धावा केल्या आहेत.

देवदत्त पडीकल
आरसीबीचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. देवदत्त पडिक्कलला RCB मोठी जबाबदारी देऊ शकते. आरसीबी व्यवस्थापन देवदत्त पडिक्कललाही कर्णधार करू शकतात यात शंका नाही.

महत्वाच्या बातम्या
भारतातही आहे एक बर्म्युडा ट्रँगल; इथे जो कोणी गेला तो कधीच परत नाही आला
आयकर विभागाच्या धाडीनंतर पहील्यांदाच सोनू सूदने सोडले मौन; प्रतिक्रीया वाचून थक्क व्हाल
“देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात”
शिवलीला पाटील यांचे किर्तन रंगणार बिग बाॅसच्या घरात; प्रथमच किर्तनकारांची एन्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.