अखेर राखी सावंतच्या नवऱ्याचा पत्ता लागलाच, वाचा कोण आहे ‘तो’

राखी सावंत सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. सध्या तिने बिग बॉसमध्ये जो धुमाकूळ घातलाय तो सगळ्यांनाच माहीत आहे. घरात तिने एक एंटरटेनर म्हणून स्थान मिळवले आहे. पण तिला पतीदेखील आहे यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता.

राखी सावंत सगळ्यांना सांगत होती माझं रितेशशी लग्न झाले आहे पण तिच्यावर कोणावरही विश्वास ठेवत नव्हतं. माझा पती पोलंडमध्ये राहतो अशी माहिती राखी सावंतने दिली होती. एवढच काय एका मुलाखतीत राखी सावंतचा भाऊ राकेशने स्पष्टपणे सांगितले होते तिचे लग्न झाले आहे ही गोष्ट खरी आहे आणि तिचा पती पोलंडमध्ये राहतो.

राकेशने पुढे सांगितले की, जेव्हा राखीचे लग्न झाले तेव्हा दोन्हीकडचे कुटुंबीय हजर होते. शिवाय माझे मामा-मामीदेखील हजर होते. यामध्ये खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. तिचे लग्न झाले आहे आणि तिने याबाबत सगळ्यांना सांगितले आहे.

राखीच्या नवऱ्याला कोणासमोर यायला आवडत नाही. त्यांना आपली ओळख कोणाला करू द्यायची नाही. पण बिग बॉसच्या मेकर्सने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. ते लवकरच सगळ्यांना पाहायला मिळतील, अशी माहिती राकेशने मुलाखतीत दिली आहे.

तिचा नवरा कोण आहे? या गोष्टीवरून लवकरच पडदा उठणार आहे. इतक्या दिवस सगळ्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. बिग बॉसमध्ये लवकरच राखी सावंतच्या नवऱ्याची एन्ट्री होऊ शकते अशा चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान राखी सावंतच्या नवरा पोलंडमध्ये काय करतो? तो राखीपासून लांब का राहतो? त्यांच्यामधील संबंध कसे आहेत? याबद्दल लवकरच खुलासा होणार आहे. राखी सावंत तिच्या नवऱ्याला पाहण्यासाठी आतुर झाली आहे. हे सर्व तिने बिग बॉसमध्ये बोलून दाखवले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.