‘खोटं कोण बोलतंय… पंतप्रधान मोदी की लडाखमधील जनता; राहुल गांधींचा मोदींना टोला’

 

नवी दिल्ली |भारत-चीनच्या बॉर्डर प्रश्नावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी केली नाही, असे स्पष्ट केले होते.

मात्र याच वेळी लडाखच्या जनतेने चीनने घुसखोरी केली, असे म्हटले होते, यावरून आता नेकमे खोटे कोण बोलत आहे, असा प्रश्न विचारत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखला अचानक भेट दिली आहे, या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून काही लडाखी नागरिकांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते नागरिक चीनने घुसखोरी केल्याचे सांगत आहे.

लडाखी जनता म्हणतेय चीनने आपली भूमी बळकावली आणि पंतप्रधान म्हणताय आपली भूमी कोणीही बळकावली नाही, म्हणजेच कोणीतरी खोटे बोलत आहे, असे राहुल गांधी म्हटले आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सकाळी लडाखच्या जवानांना ‘सरप्राईज भेट’ दिली आहे. यावेळी मोदींनी जवानांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

तसेच सीमेवरील घडामोडींचा आढावा घेतला आहे. सोबतच सुरक्षा व्यवस्थेची पाहणीही नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.