Gautami Patil : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रचंड प्रसिध्दी मिळवली आहे. विशेषतः कोरोनाकाळात घरी असल्यामुळे सर्वांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. डान्स, गाणी, वेगवेगळ्या रेसिपीज अशा अनेक कला दाखवून अनेकांनी आपले लाइक्स आणि फॉलोवर्स वाढवले आहेत.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवलेली अशीच एक मुलगी म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटील ही एक डान्सर आहे. तिने लावणी सम्राज्ञी म्हणून अख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिच्या लावणीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
गौतमी पाटील ही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. तिने तिच्या नृत्यातून अनेकांच्या मनावर छाप उमटवली आहे. गौतमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.
यासोबतच गौतमीला अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये बोलवले जात असते. त्याचे तिला मानधनही दिले जाते. गौतमीचे वय जवळपास २७ वर्षे असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. गौतमीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
गौतमी पाटील ही नुकतीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये गौतमीने एका कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्याने ती प्रचंड ट्रोल झाली होती. तिच्या विचित्र स्टेप्सचा हा डान्स व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल झाला. त्यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रातून तिच्यावर टीका केल्या गेल्या.
दरम्यान, गौतमी पाटील ही कोल्हापूर येथील आहे, याशिवाय तिच्याबद्दल इतर कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. गौतमीचे शिक्षण, आईवडील यांच्याविषयी अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. गौतमीने एवढी प्रसिध्दी मिळवल्यानंतरही तिच्याबद्दल फारशी माहिती पुढे आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
Trupti Desai : पुण्याचे राजकारणी इतके निर्लज्ज कसे झाले? विनायक निम्हणांच्या निधनाला २४ तासही झाले नाही तोच…
Eknath Shinde : राज्यातील प्रकल्प गुजरातला का जाताय? मुख्यमंत्री शिंदेंनी सोडलं मौन, म्हणाले…
Pune : पुणे तिथे काय उणे! तरुणाने पोलिसांचीच काढली चुक, दोन हजारांचे कापलेले चलन केले रद्द