अनिल देशमुख यांची विकेट घेणाऱ्या ऍड. जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

 

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर ऍड. जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या चौकशीची याचिका हायकोर्टात दाखल केली होती, या याचिकेवर निर्णय देत सीबीआयला १५ दिवसांसाठी प्राथमिक चौकशीची मुदत  देण्यात आली आहे.

त्यामुळे आता  सीबीआयकडून १५ दिवसांमध्ये परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. असे असताना आता अनिल देशमुख यांनी स्वतःहून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जयश्री पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे.

जयश्री पाटील याआधी मराठा आरक्षणाच्या प्रकरणामुळे चर्चेत आल्या होते. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, विशेष म्हणजे त्या मराठा असून सुद्धा त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता. तसेच त्यांनी हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली होती.

जयश्री पाटील या जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल के पाटील यांच्या कन्या आहे. तसेच मानवाधिकारांबाबत त्यांचे काम असते आणि त्याबाबत जयश्री यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहे. तसेच जयश्री यांनी मानवी हक्क आयोग संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून पण काम केले आहे.

आता निकालानंतर जयश्री यांनी पुन्हा एकदा अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही मोठे मराठा नेते असाल किंवा शरद पवारांचा तुमच्यावर वरदहस्त असेल पण कायदा आणि संविधानापेक्षा तुम्ही मोठे नाही, अशी टीका जयश्री पाटील यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.