९ मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते. या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन देखील जारी केले होते. ही घटना एक अपघात होता. तांत्रिक बिघाडामुळे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ हे क्षेपणास्त्र पाकिस्तानवर सुटले होते, असे संरक्षण मंत्रालयाने या निवेदनात म्हंटले होते.(Who caused the BrahMos missile to land in Pakistan?)
या प्रकरणात हवाई(Air) मुख्यालयातील एअर व्हाइस मार्शलला तपासाची जबाबदारी देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी या प्रकरणात सखोल तपास सुरू केला आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात ग्रुप कॅप्टन दर्जाच्या एका अधिकाऱ्याला दोषी मानले जात आहे. हा अधिकारी क्षेपणास्त्र प्रणालीच्या मोबाईल कमांड पोस्टचा प्रभारी होता.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १५ मार्च रोजी संसदेत या प्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, “या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्दैवाने ९ मार्च रोजी चुकून क्षेपणास्त्र डागण्यात आले. नियमित तपासणीदरम्यान ही घटना घडली. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडल्यानंतर आम्हाला याबद्दल माहिती मिळाली”, असे त्यांनी राज्यसभेत सांगितले होते.
भारतीय क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित आहे. तसेच भारतीय सशस्त्र दलांना अशा यंत्रणा हाताळण्याचा अनुभव आहे, असे देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत म्हणाले होते. पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डीजी मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी या घटनेसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.
“९ मार्चला संध्याकाळी ६.४३ वाजता आमच्या एअर डिफेन्स ऑपरेशन सेंटरमधून भारतातून पाकिस्तानात येताना आम्हाला एक मिसाईल दिसली. ती मिसाईल पाकिस्तानी हवाई हद्दीचे उल्लंघन करत मियां चन्नू परिसरात संध्याकाळी ६.५० वाजता पडली. ही मिसाईल खाली असल्यामुळे मिसाईलमुळे मोठ्या प्रमाणात काही नुकसान झाले नाही”, अशी माहिती डीजी मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी दिली होती.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की, “भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्यानंतर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, पण आम्ही संयम दाखवला.” हे भारतीय सुपरसॉनिक क्षेपणास्त्र लाहोरपासून सुमारे २७५ किमी अंतरावर पाकिस्तानी हद्दीत पडले होते. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
महत्वाच्या बातम्या :-
बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ला सलग दुसरा धक्का; मंगळवारी केली फक्त ‘एवढी’ कमाई
..तर मित्र असणं आवश्यक नाही, खेळाडूंच्या आपआपसातील वादावर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य
सामंथाच्या जबड्यातून ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने काढून घेतली अल्लू अर्जुनची फिल्म, नाव वाचून अवाक व्हाल