Shivsena : महाराष्ट्र विधानसभेत मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई सुरू झाले आहे. यादरम्यान पहिल्याच दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने ५६ पैकी ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे.
आमदार ऋतुजा लटके यांना व्हीप बजावण्यात आलेला नाही, कारण त्या मशाल चिन्हावर निवडून आल्या आहेत . शिंदे गटाकडून बजविण्यात आलेल्या व्हिपला ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टात व्हीप बजावणार नाही, असं सांगितलं असताना देखील व्हीप बजावण्यात आल्याचं ठाकरे गटाने म्हणत आक्षेप व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाने व्यक्त केलेल्या या आक्षेपानंतर शिवसेनेने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना शिवसेना आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, व्हीप काढला गेला आहे. तो सगळ्यांना बंधनकारक असतो. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. जरी व्हीपचे उल्लंघन झाले, तरी सुप्रीम कोर्टाचे आदेश येईपर्यंत आमदारांवर कारवाई केली जाणार नाही.
यादरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष बंगल्यावर ४० आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय धोरणावर चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीत व्हीप जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाणचिन्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या अडचणीत वाढ झाली असून व्हीपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उद्धव ठाकरे गटातील आमदार या व्हीपचे पालन करतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.
व्हीप म्हणजे काय?
व्हीप म्हणजे, पक्षाचा आदेश. व्हीप बजावल्यास आमदारांना त्याचं पालन करणे बंधनकारक असते. व्हीपचे पालन न केल्यास संबंधित पक्ष त्या आमदारांवर कारवाई करू शकतो. आदेशाची पालन न केल्यास आमदाराचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती पक्षाच्या वतीने पिठासीन अधिकाऱ्यांकडे करण्यात येते.
महत्वाच्या बातम्या
दोन रुपयांचा चेक मिळालेल्या शेतकऱ्याची कृषीमंत्री दादा भुसेंनी लावली थट्टा; म्हणाले, मालेगावमध्ये…
कोण मारणार बाजी? एक्झिट पोलमधून धाकधूक वाढवणारी आकडेवारी आली समोर
पुण्याच्या गोल्डमॅनचा दीड कोटींचा सोन्याचा शर्ट लंपास: धक्कादायक माहिती आली समोर