‘चीनसोबतचा तणाव वाढत असताना, केंद्रात शरद पवारांकडे मोठी जबाबदारी’

 

मुंबई | बुधवारी राज्यसभा खासदारांनी शपथ घेतली आहे. तसेच संसदेच्या स्टँडिंग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीत सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर, चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.

एकीकडे कोरोनाने देशभरात थैमान घातल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक समस्या निर्माण होत आहे. तर दुसरीकडे भारत-चीन सीमा वादामुळे देशाचे पूर्ण लक्ष सरंक्षण समितीकडे असणार आहे. या दोन्ही ठिकाणी मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांना रेल्वे कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे. तर रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.