Share

Supriya Sule : दिल्लीतील खासदार थांबवून विचारतात, विधानसभेत रमी कोण मंत्री खेळत होता? सुप्रिया सुळेंचा दावा

Supriya Sule : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर (State Government) जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री (Chief Minister) स्वतः अस्वस्थ आहेत. त्यांना काय सुरू आहे याची जाणीव आहे.” दिल्लीला गेल्यावर अनेक खासदार त्यांना विचारत होते की, “रमी खेळणारा मंत्री कोण आहे?” ही चर्चा दिल्ली (Delhi) पर्यंत पोहोचल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील क्राईम वाढ, आर्थिक अडचणी, आणि सरकारमधील गोंधळ यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशात खराब झाली असल्याचंही सुळे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते आणि त्यांनी मंत्र्यांच्या वागणुकीबाबत आपला रागही व्यक्त केला असल्याचं त्या म्हणाल्या.

व्हिडिओ प्रकरणावर माणिकराव कोकाटेंना उद्देशून टोला

पहिला व्हिडिओ बाहेर आल्यानंतर माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा होता, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं. “राजीनामा स्वतःहून दिला गेला पाहिजे, तो सांगितल्यावर द्यावा लागतो याचे वाईट चित्र आहे. दिल्लीतून मध्यस्थी झाली की मगच निर्णय होतो. हे योग्य नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्यास विरोधच

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पुनर्नियुक्तीबाबत सुळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्या मागे कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या हातातली सत्ता कशासाठी वापरली जात आहे? जर अशा व्यक्तींना क्लीन चिट देऊन मंत्रिमंडळात आणणार असाल, तर आम्ही त्याला नक्कीच विरोध करू,” असं त्या म्हणाल्या. त्यांचा आरोप होता की, “लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना मंत्रीपद दिलं जात आहे.”

महिला मंत्र्यांना विरोध का?

माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यातील वादावर सुळे म्हणाल्या, “माधुरीताई एक महिला मंत्री आहेत. त्या चौकटीत राहून काम करत आहेत. एखादी महिला मंत्री काहीतरी नवीन करत असेल तर त्याला विरोध का? एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजना राबवायची आणि दुसरीकडे महिलेला अडथळा आणायचा ही दुहेरी भूमिका योग्य नाही.”

अमित शहांशी चर्चा होणार

वाल्मिक कराड जेलमधून फोनवर बोलत असल्याची माहिती सुळे यांनी दिली. “त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं जात आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी आम्ही अमित शहा (Amit Shah) यांची वेळ मागितली आहे. त्याचप्रमाणे महादेव मुंडे (Mahadev Munde) प्रकरणावरही त्यांच्याशी चर्चा केली जाईल,” असं त्यांनी सांगितलं.

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्थानिक स्तरावर बैठक घेतल्याचंही सुळे यांनी स्पष्ट केलं. “आम्ही स्थानिक नेतृत्वाच्या मार्गदर्शनात निवडणुकीसाठी तयारी करतो आहोत. काही दिवसांत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now