दिपाली चव्हाण यांच्या बदलीसाठी मविआच्या नेत्याने पैसे उकळले? भाजपाचा गंभीर आरोप

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपुर्वी दिपाली यांनी सुसाइड नोट लिहून उप वन संरक्षक(DFO) विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तर दुसरीकडे या प्रकरणामुळे वनविभागातील अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. आता मेळघाटातील बदल्यांचे रॅकेटही दीपाली यांच्यापर्यंत पोहचलं होतं व त्यांची त्यातून फसवणूक झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. मेळघाट या दूर्गम भागातील वनक्षेत्रात सेवेत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना साधारणत: ३ वर्षांनी बदली दिली जाते.

मात्र दिपाली यांनी बदलीसाठी अर्ज केल्यानंतर वेगळ्या मार्गाने त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले, असा धक्कादायक दावा भाजपकडून करण्यात आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणतात, ‘दीपाली चव्हाण यांची मेळघाटात २०१४ पासून २०२१ पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. त्यामुळे मेळघाटाबाहेर त्यांना बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा किंवा अमरावती येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.’

मात्र, बदलीसाठी त्रयस्थांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यात महाविकास आघाडीतील एका महत्त्वाच्या नेत्याने त्यांच्याकडून पैसे घेतले. हे पैसे घेऊनही त्यांची बदली केली गेली नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. म्हणूनच त्यांनी कोणत्या नेत्याला पैसे दिले होते?, याचा तपास केला गेला पाहिजे, अशी मागणी कुळकर्णी यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

वीकएण्डला लॉकडाऊन; वाचा कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील?

अरे वा! कोरोनाची लस टोचून घ्या आणि सोन्याची नथ घेऊन जा

केकेआरचा खेळाडू निगेटिव्ह काय आला? भाऊने तर डान्सच सुरू केला; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.