कुठं गेली माणुसकी! वृद्ध वाहून जात होता आणि ग्रामस्थ व्हिडीओ काढत होते, पहा भयानक व्हिडीओ

नांदेड। सध्या गेले चार ते पाच दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले तुडुंब भरले आहेत. तर रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. अशातच एका वृद्धाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

मात्र धक्कादायक म्हणजे या अडकलेल्या वृद्धाच्या आजूबाजूला अनेक लोक होते मात्र त्या वृद्धाला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. मात्र सगळे त्या अडकलेल्या वृद्धाचा व्हिडिओ काढत असल्याचा धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे.

या व्यक्तीच नाव विठ्ठल माने असून त्यांचे वय ६५ वर्षीय होते. ते शनिवारी संध्याकाळी शेतातून घराकडे येत होते. त्यांचा घराकडे जाण्याचा रस्ता हा खातगाव येथील पुलावरून आहे.

मात्र पावसामुळे खातगाव येथील पुलावर त्यावेळी गुडघ्यावर पाणी होते. व विठ्ठल माने पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिक उभे होते. त्याचवेळी माने हे पाण्यातून मार्ग काढत पूल ओलांडण्यासाठी जात होते.

परंतु अर्धा पूल पार केल्यानंतर पाण्याचा जोर अचानक वाढल्याने तोल जाऊन ते वाहून गेले. मात्र एवढे नागरिक असूनही त्यांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे गेले नाही. त्यानंतर वृद्धाचा मृतदेह शेजारच्या तलावाच्या जवळ आढळून आला.

या प्रकरणी संबंधित तलाठ्याने पंचनामा करत अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे. मात्र या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.