Share

मातोश्रीला कधी भेट देणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगीतली वेळ…

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. काल एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला आहे.(When will you visit Matoshri? Time told by Chief Minister Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन केले आहे. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांची भेट घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी रात्री गोव्याला पोहचले.

यावेळी बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत केले. सर्व बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी शनिवारी मुंबईला येणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तुम्ही मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न पत्रकरांकडून विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मातोश्रीला कधी भेट देणार हे लोकांना वेळ आल्यावर कळलेच.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्लोअर टेस्टच्या संदर्भात देखील माहिती दिली आहे

“आमच्याकडे सध्या १७५ आमदार असल्याने फ्लोअर टेस्ट ही केवळ औपचारिकता आहे आणि ती आम्ही सहज जिंकणार आहोत. आमच्याकडे १७५ चा आकडा आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे वक्तव्य केले आहे.

“आपण आता नवीन सुरवात करत आहोत. आपल्यासोबता अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करताना अडचणी येणार नाहीत. समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. ही एका रथाची दोन चाके आहेत. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायचा आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
…आणि देवेंद्र फडणवीसांना अश्रु अनावर; वाचा ‘सागर’ बंगल्यावर नेमकं घडलं काय?
उदयपूरमधील हिंदू युवकाच्या हत्येला सर्वस्वी भाजपची नुपूर शर्मा जबाबदार – सर्वोच्च न्यायालयाने झापले
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! मध्यरात्री धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now