संजय राऊतांसारख्या तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?, चित्रा वाघ यांचा रश्मी ठाकरेंना सवाल

मुंबई। अहो राऊत, एका महिलेवरती अत्याचार होऊन तिचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तुम्ही त्या महिलेला राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरून महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झाला आहे. तुम्ही फक्त भावनिक गप्पा झोडता आणि त्यानंतर ताई तुम्ही घाबरू नका, हल्लेखोरांना शिक्षा होईल सांगत भावनिक भुरळ घालता असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या सामना अग्रलेखावर संताप व्यक्त केला आहे.

एखादी मोठी घडामोड घडली की दुसऱ्या दिवशी सामना अग्रलेखतून संजय राऊत हे आपलं मत व्यक्त करत असतात. मात्र बऱ्याचदा हे मत वादग्रस्त असल्याचे पाहतो. राऊत सामना अग्रलेखातून विरोधकांवर टीका करत असतात. तसेच ते बऱ्याचदा आपलं कणखर मत मांडत असतात.

आताही संजय राऊत यांनी सामनामध्ये अग्रलेख लिहित मुंबई जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, असं म्हणालं होतं. व याच विधानावरून संजय राऊत यांचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

संजय राऊतांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीचं उदाहरण दिल आहे. मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरेंना विचारायचंय की, तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेवा- दाव्यांसाठी करता आहात. अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.

अहो राऊत, एका महिलेवरती अत्याचार होऊन तिचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तुम्ही त्या महिलेला राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरून महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झाला आहे. तुम्ही फक्त भावनिक गप्पा झोडता आणि त्यानंतर ताई तुम्ही घाबरू नका, हल्लेखोरांना शिक्षा होईल सांगत भावनिक भुरळ घालता, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राग व्यक्त केला आहे. दरम्यान चित्रा वाघ यांना आणखी एक प्रश्न विचारला आहे.

चित्रा वाघ यांनी “संजय राऊत, तुम्ही मुंबई सिपी केव्हापासून झालात, तपास पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही अग्रलेखातून अत्याचार करणारा ‘एकच’ नराधम होता असे घोषित करताय.. ही धडपड कुणाला वाचवण्यासाठी… की ही विकृती… मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचे आहे की तुमचा कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करतो आहे अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार…?” असं देखील म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
बॉलीवूडमध्ये धडाकेबाज कामगीरी केलेली ही अभिनेत्री वळली अध्यात्माकडे; हे आहे त्यामागचं कारण 
‘प्रवीण दरेकर तुम्ही महिलांची माफी मागा, नाहीतर थोबाड रंगवू’
‘या’ वृत्तपत्राच्या एका चुकीमुळे राजकारणात माजला हाहाकार; असे होऊ लागले आरोप-प्रत्यारोप… 
‘कपिल शर्मा शो’मध्ये कंगना रानौतने केला धक्कादायक खुलासा; लॉकडाऊन दरम्यान २०० एफआयआर चा सामना करावा लागला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.