अंतिम टप्प्यात असलेली कोरोनावरील लस कधी उपलब्ध होणार ? WHO ने सांगितली वेळ

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाने जोर पकडला आहे. सर्वांचे लक्ष कोरोनावरील लस कधी येईल याकडे आहे. जगभरात कोरोना लसींवर चाचण्या सुरू आहेत.

जगभरात एकूण १६५ लसींवर चाचण्या सुरू असून त्यापैकी २६ लसींचे ह्युमन ट्रायल सुरू आहेत. कोणती लस यशस्वी होऊन बाजारात येईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोरोनाची लस २०२१ पर्यंत बाजारात येईल असा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे.

कोरोनाची लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात असल्याने ही लस तयार आहे असे म्हणता येणार नाही. कारण अजूनही मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण व्हायचाय असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

सर्वाना प्रतीक्षा आहे ती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लसीची. त्यावरील क्लीनिकल चाचण्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू आहेत. ऑक्सफोर्ड प्रोजेक्टमध्ये पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ही कंपनी भागीदार आहे.

कोरोना लसीवर प्रथम काम सुरू करणाऱ्या अमेरिकेतील मॉडर्ना या कंपनीने पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत ज्याचे चांगले परिमाण आले आहेत. त्यांची तिसरी चाचणी २७ जुलैपासून सुरु होणार आहे.

भारतात भारत बायोटेक कंपनीने कोरोनावरील लस विकसित केली आहे. सध्या त्या लसीचा मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू आहे. जगात १ कोटी ९७ लाख कोरोनाबाधित रुग्ण आहेत. थोड्याच दिवसात हा आकडा २ कोटी होऊ शकतो. मात्र अद्यापही कोरोनावरील लस आलेली नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.