भारताला कोरोनाची लस कधी मिळणार?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यानी दिली आनंदाची बातमी

दिल्ली | भारताची कोरोना लस ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लसीकडे आता सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. ही लस बाजारात कधी येईल याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. याबाबत आता केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बोलताना हा दावा केला आहे. पुढे ते म्हणाले की, जगभरात बनवण्यात येणाऱ्या कोरोना लसींचे फास्ट ट्रॅक करण्यात येत आहे. भारतातील कोरोना लसीचे ट्रायल २०२० च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे.

भारत बायोटेक ज्या लसीवर काम करत आहे ती लस आपल्याला वर्षाच्या शेवटपर्यंत मिळेल. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने करार केला आहे. त्यामुळे ही लस जर यशस्वी झाली तर ती भारतात खूप स्वस्तात उपलब्ध होईल.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आधीच स्पष्ट केले आहे की, ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोरोना लसीचे उत्पादन करणार आहेत त्यामुळे ही लस बाजारात लवकर उपलब्ध होईल. आता फक्त लस तयार होण्याची प्रतीक्षा आहे.

लसी बाजारात आणण्यासाठी कमीत कमी एक महिन्याच्या कालावधी लागेल. लस उपलब्ध होताच सर्वात आधी या लसी आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. त्यानंतर वयस्कर व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना दिली जाईल. त्यानंतर उपलब्ध पुरवठ्यानुसार पुढील लसीकरण देण्यात येईल, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.