माहीला पाहिल्यावर नवऱ्याची आठवण येते; सानिया मिर्झाने केली माहीची तुलना पाकिस्तानी खेळाडूशी

नवी दिल्ली |  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यावर भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने प्रतिक्रिया देत असताना महेंद्र सिंह धोनीची तुलना पाकिस्तानी खेळाडूशी केली आहे.

सानिया मिर्झाने पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलीक याच्याशी माहीची तुलना केली त्यावरुन सोशल मीडियाद्वारे नेटकऱ्यांनी सानियावर टीकेची झोड उठवली आहे.

‘स्पोर्ट्सकीडा’ला दिलेल्या मुलाखतीत सानियाने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्याला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते असेही म्हटले.

धोनीची इच्छा असती तर तो फेअरवेल सामना खेळला असता आणि मैदानावर उतरुन कारकिर्दीला अलविदा केले असते. परंतु त्याने शांतपणे यापासून दूर जात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

हीच बाब त्याला कॅप्टन कुल बनवते, असे 33 वर्षीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा म्हणाली. तसेच त्याने स्वतःसाठी नाही तर देशासाठी खूप काही कमावले, असेही सानिया म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-

-महेंद्रसिंग धोनीला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते- सानिया मिर्झा

-“प्रशांत भूषण यांनी आपल्या मनातील प्रश्नांना वाचा फोडलीय, त्यांच्या पाठीशी निर्भयपणे उभे रहा”

डॉक्टरांची सीबीआयकडे कबुली; मुंबई पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी घाई केली, त्यामुळे.. 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.