जेव्हा संजय दत्तच्या घरात एके-५६ रायफल सापडली होती तेव्हा काय काय घडले होते? वाचा सविस्तर

अभिनेता संजय दत्तबद्दल सांगायचे झाले तर तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संजय दत्त होता तर नायक पण नंतर तो खलनायक बनला होता. सुपरहिट अभिनेत्याला जेव्हा १९९३ मध्ये अटक झाली होती तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता.

सुपरस्टार म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या संजय दत्तवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते. स्वता संजय दत्तलाही माहित नव्हते की पुढे त्याच्यासोबत काय घडणार होते. नर्गिस आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त याने आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

खुप कमी वेळात त्याने मोठे नाव कमावले होते. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या संजय दत्तला जेव्हा अटक झाली तेव्हा कोणालाही विश्वास बसत नव्हता. त्याला टाडा प्रकरणात ६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आज आम्ही तुम्हाला या प्रकरणाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ही गोष्ट आहे १९९३ सालची. जेव्हा १२ मार्च रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात २५७ लोक ठार झाले होते आणि ७१३ लोक जखमी झाले होते.

१९ एप्रिल १९९३ रोजी मुंबई बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी संजय दत्तला अटक केली होती. जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा कोणालाही विश्वास बसत नव्हता. संजयवर हा आरोप होता की त्याच्या घरी त्याने एके ४७ रायफल ठेवली होती.

या रायफलचा संबंध थेट मुंबई बॉम्बस्फोटाशी लावण्यात आला होता. अबू सालेम व रियाझ सिद्दीकी यांच्याकडून अवैध शस्त्रसाठा घेतल्यामुळे संजय दत्तला अटक झाली होती. संजयने नंतर शस्त्रांना नष्ट केले होते त्यामध्ये तो दोषी आढळला होता.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. त्यानंतर संजय दत्त १८ दिवस तुरूंगात होता. मात्र अनेक प्रयत्नानंतर ५ मे रोजी त्याला जामीन मिळाला होता. त्यावेळी त्याने सांगितले होते की मी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी शस्त्रे बाळगली होती असे सांगितले होते.

१९९३ मध्ये संजयवर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा प्रकरण सुरू झाले होते. ३० जून १९९५ रोजी त्याचा खटला सुरू झाला होता. त्यात त्याची निर्दोष सुटका करण्यात आली होती. परंतु त्याला शस्त्र कायद्याअंतर्गत ६ वर्षांची शिक्षा झाली होती.

१९ एप्रिलला संजय दत्तला मुंबई पोलिसांना अटक केली होती. झडती दरम्यान त्याच्या घरातून एके ५६ रायफल मिळाली होती. २६ एप्रिल १९९३ ला संजय दत्तने पोलिसांना सर्व सत्य सांगितले होते. ३ मे १९९३ ला त्याला जामिनावर सोडण्यात आले होते.

४ मे १९९४ ला त्याचा जामिन रद्द झाला आणि त्याला पुन्हा अटक झाली. २८ नोव्हेंबर २००६ ला टाडा ऍक्ट संबंधित सर्व प्रकरणात तो निर्दोष सुटला होता. ३१ जुलै २००७ ला बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्यामुळे त्याला सहा वर्षांची शिक्षा झाली होती.

२१ मार्च २०१३ ला सर्वोच्च न्यायालयाने टाडा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली पण शिक्षेची मुदत पाच वर्षांपर्यंत कमी करण्यात आली होती. यानंतर २०१४ ला आणि २०१५ ला तो काही दिवस सुट्टीवर बाहेर आला होता.

चांगल्या वागणुकीमुळे त्याला २०१६ ला निर्दोष घोषित करण्यात आले आणि त्याची सुटका झाली. यानंतर त्याने पुन्हा चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. आता सध्या तो केजीएफ २ मध्ये झळकणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
या महिलेच्या केकचे सेलिब्रीटीसुद्धा आहेत दिवाने, केक बनवून कमावते ३० ते ४० लाख रूपये
डोक्यावर पदर घेऊन ही महिला चालवतेय लक्झरी; व्हिडिओ पाहून तुम्हाला पण वाटेल गर्व
फक्त १२ रनांचा टार्गेट पुर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खेळल्या होत्या १६ ओव्हर; वाचा त्या ऐतिहासिक मॅचबद्दल
करण जोहरच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून तुमची झोप उडेल; आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.