Homeइतर..तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंदही माईंना पाहून खुर्चीवरून उठले होते, पुन्हा व्हायरल होतोय...

..तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंदही माईंना पाहून खुर्चीवरून उठले होते, पुन्हा व्हायरल होतोय तो व्हिडीओ

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधूताई सपकाळ या ७५ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे निधन झाले आहे. पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राण ज्योत मावळली. सोशल मिडीयावर त्यांच्या जाण्याने अनेकांनी दुख व्यक्त केले आहे.

यानिमित्ताने अनेकांना सिंधूताई सपकाळ यांचा पद्मश्री घेतानाचा प्रसंग आठवला. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते. काही दिवसांपुर्वीच हा सोहळा पार पडला. त्यावेळी अनाथांच्या माता सिंधुताई सपकाळही उपस्थित होत्या.

त्यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जेव्हा सिंधुताई सपकाळ यांना व्हिलचेअरवर येताना पाहिले तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंदही आपली खुर्ची सोडून पायऱ्या उतरून त्यांच्याकडे आले होते. माईंच्या निधनानंतर पुन्हा या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अनेक लोक माईंच्या या आठवणी शेअर करत आहेत.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळा पार पडला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०२१ च्या पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अनेकांना हा पुरस्कार देण्यात आला त्यात सिंधुताई सकपाळ यांचेही नाव होते. या पुरस्कारासाठी माई व्हिलचेअरवर पोहोचल्या होत्या.

त्यांना पाहताच रामनाथ कोविंद खुर्चीवरून उठले आणि तातडीने पायऱ्यांवरून खाली आले. त्यानंतर त्यांनी सिंधुताईंना वाकून पद्मश्री पुरस्कार दिला होता. माईंना पायाने चालता येत नव्हते. त्यामुळे त्यांना व्हिलचेअरवर आणण्यात आले होते. सिंधुताईंचा राजभवनातील हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आज माईंच्या निधनानंतर या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

गेली चार दशके अनाथांच्या आई म्हणून काम त्यांनी केले. त्यांना प्रेमाने सगळी मुलं माई म्हणायच्या. दरम्यान, सिंधूताई सपकाळ यांचे महिन्याभरापूर्वी हर्नियाचे ओपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज त्यांचा हृहयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. त्यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांना सांभाळले आहे.

महत्वाच्या बातम्या
अनाथांचे पोट भरण्यासाठी ट्रेनमध्ये मागितली भीक; स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली “
‘अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
५० टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने जारी केल्या नवीन गाईडलाईन्स
…तर मुंबईत लॉकडाऊन होणार; मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग यांचे मोठे वक्तव्य