शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात(Maharashtra) राजकीय संकट निर्माण झाले आहे. या घटनांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे.(When people thought that Uddhav Thackeray was gone, the opposite happened! See their record)
उद्धव ठाकरे संपले आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. पण ज्यावेळी लोकांना उद्धव ठाकरे संपले आहेत असे वाटले आहे, त्यावेळी नेमकं उलटंच घडलं आहे. त्या परिस्थितीत उद्धव ठाकरे जोमाने पुढे आले आहेत आणि त्यांनी स्वतःच वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सध्याच्या परिस्थितीत देखील उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका लोकांसमोर मांडली आहे.
धवल कुलकर्णी यांच्या ‘द कझिन्स ठाकरे’ या पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे. या प्रसंगामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळण्यासाठी दररोज दादरला यायचे. एकदा बॅडमिंटन खेळत असताना उद्धव ठाकरे पडले. त्यावेळी सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यावर हसू लागले.
त्यानंतर काही दिवस उद्धव ठाकरे बॅडमिंटन खेळण्यासाठी दादरला गेलेच नाहीत. उद्धव ठाकरे बॅडमिंटन खेळण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी एक क्लबमध्ये जाऊ लागले. उद्धव ठाकरे यांनी सहा महिने बॅडमिंटनचे रितसर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा दादरला बॅडमिंटन खेळण्यासाठी येऊ लागले. उद्धव ठाकरे त्यानंतर एका चांगल्या बॅडमिंटन खेळाडूप्रमाणे खेळत होते.
राजकरणात देखील उद्धव ठाकरे यांनी सर्व गोष्टींचा भक्कमपणे सामना केला आहे. नारायण राणे यांनी केलेलं बंड असेल किंवा भावाने म्हणजेच राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून नवीन पक्षाची केलेली स्थापन असेल, हृदय शस्त्रक्रिया असेल अशा सर्व गोष्टींना उद्धव ठाकरे अत्यंत धैर्याने सामोरे गेले आहेत.
तसेच बाळासाहेबांचं निधन असेल. या सर्व घटनांच्या वेळी सर्वजण उद्धव ठाकरे कमजोर पडले आहेत, अशी चर्चा करत होते. पण उद्धव ठाकरे यांनी संघर्ष करत या सर्व चर्चांना प्रत्युत्तर दिले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा उद्धव ठाकरे कशापद्धतीने सामना करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘४ दिवस थांबा बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील’
“पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”; शिवसेनेचा निर्धार
‘…तर नक्कीच एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार परत येतील’; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य