“जेव्हा माझं गाणं प्रदर्शीत होतं, तेव्हा लोकं मला वेगळ्या चश्म्यातून पाहतात”; अमृता फडणवीसांनी व्यक्त केली खंत

मुंबई। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम चर्चेत असतात. अमृता फडणवीस या कायम आपल्या चाहत्यांसाठी आपलं गाणं घेऊन येत असतात. मात्र काहीजण या गाण्यांवरून अमृता फडणवीस यांच्यावर टीका करत असतात.

नुकतंच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांचं एक गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. मात्र या गाण्यावर प्रचंड टीका केली जात आहे. याच टीकाकारांची अमृता फडणवीस यांनी शाळा घेतली आहे. एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या की, जेव्हा माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात.

त्या म्हणाल्या मी एका भाजप नेत्याची पत्नी आहे, म्हणून मी काहीही केलं किंवा म्हटलं. तर, या लोकांना वाटतं की, मी तेथून प्रेरणा घेऊनच हे करत आहे. पण, माझ्या ट्विटरवरील ज्या कमेंट असतात, त्या माझ्या विचारानुसार, मला वाटलं की असं लोकांपुढे म्हणायचं आहे, तर ते ट्विट केललं असतं, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी किंवा माझा भाजपकडे कल आहे म्हणून मी लिहत असते. माझं गाणं ही माझी फॅशन आहे, त्यामुळे मी गाणं करत असते, असं स्पष्टपणे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

दरम्यान गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गणेश वंदना असं या गाण्याचं नाव असून या गाण्यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली आहे.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक बातमी! देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी, ICMR च्या माजी प्रमुखांचा दावा
श्रीराम लागूंच्या मुलाच्या निधनामागे आहे खूपच धक्कादायक कारण; आजही दुःख विसरणं कठीण
किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हसन मुश्रीफ संतापले 
‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत जरी मारली’…चंद्रकांत दादांच्या वक्तव्याने शिवसेना खवळली?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.