बायको घरी नसताना मैत्रिणीला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला

नवी दिल्ली। सध्या सोशल मीडियावर अनेक अनोळखी लोक आपले मित्र मैत्रिणी होतात. ज्यांना आपण ओळखत नाही, बघितलं नाही तरीही आपण त्यांच्याशी संवाद साधतो. मात्र सोशल मीडियावरील मैत्रीमुळे अनेकजण फसल्याचे आपण ऐकले आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

तरुणाला फेसबुकद्वारे तरुणीसोबत मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याने या तरुणीला बायको घरी नसताना बोलावलं होत, व त्यानंतर त्या तरुणीने सामान आणण्याच्या बहाण्याने तिने तरुणाला घराबाहेर पाठवल. संधीचा फायदा घेत तिने त्याच्या पत्नीचे दागिने आणि 22 हजार रुपयांसह लंपास केले आहेत.

हा तरुण त्रिलोकपुरी भागात पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याची फेसबुकच्या माध्यमातून लखनौमध्ये राहणाऱ्या हेमलता पाठक नावाच्या तरुणीशी ओळख झाली. तिने आपण ज्योतिषी असल्याचं तरुणाला सांगितलं होतं. सुरुवातीला चॅटिंग झाल्यानंतर दोघांनी नंबर शेअर केले. दोघांमध्ये गप्पा वाढल्या.

तो तिला हरिद्वार आणि वृंदावनलाही फिरण्यासाठी घेऊन गेला होता. अनेक वेळा ते दिल्लीत भेटले होते. तक्रारदार तरुणाची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. हेमलताने त्याच्या घरी येण्यात उतावळी झाली होती. त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर सामान आणण्याच्या बहाण्याने तिने त्याला घराबाहेर पाठवलं.

तरुण घरी आला असता, त्याला धक्काच बसला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलं होतं. घरातील लॉकर उघडा होता. पत्नीचे दागिने आणि 22 हजार रुपये गायब झाले होते. तरुणाने तिला फोन केला, तेव्हा त्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या
रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप, फेसबुक लाईव्ह करत केले आरोप
डेव्हिड वॉर्नरचा कुटुंबासोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पासून व्हाल त्याचे फॅन, पाहा व्हिडिओ
त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, एकदम 70mm.. केदार शिंदेंची खास पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.