Homeइतरचिमुकला मुलगा आणि नवऱ्याचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा

चिमुकला मुलगा आणि नवऱ्याचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळ्यांचेच प्रचंड नुकसान झाले. सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले. सर्वांनाच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेकांनी हतबल होऊन आपले जीवन संपवले. आता, कुठेतरी लोक आपले जीवन सुधारत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बापानेच स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलाचा गळा आवळून आत्महत्या केलेली धक्कादायक घटना समोर आली आहे.

यावल तालुक्यातील फैजपूर शहरात सहा वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर वडिलांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फैजपूरतील मिरची ग्राऊंड परिसरात आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. निलेश घनश्याम बखाल असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांचे वय ३५ वर्ष होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी आर्यन या स्वत:च्या मुलाचा खून केला. मुलाचे वय अवघे ६ वर्ष एवढे होते.

फैजपूर शहरातील बसस्थानकामागील मिरची ग्राऊंड परिसरात निलेश बखाल हे पत्नी व मुलगा आर्यन याच्यासह राहत होते. फैजपूर शहरात त्यांनी अलीकडेच बापू डेअरी नावाने डेअरी देखील सुरू केली होती. घटनेच्या सकाळी साडेअकरा वाजता निलेश बखाल हे किराणा आणण्यासाठी पत्नीला बाजारात सोडून परत घरी आले. त्यानंतर घराचा दरवाजा बंद करून त्यांनी मुलाचा गळा आवळून खून केला व नंतर दोरीच्या साह्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

किराणा घेऊन व बाजार करून त्यांच्या पत्नी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा ठोठावूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारच्यांच्या मदतीने त्यांनी दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यावर त्यांना पती व मुलाचा मृतदेह आढळून आला. हे दृश्य पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी तेथे हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यानंतर, मुलगा आर्यन व वडील निलेश या दोन्हीवर यावल ग्रामीण येथे डॉ बी बी बारेला आणि डॉ तिडके यांनी शवविच्छेदन केले. या गुन्ह्याचा तपास फैजपूर पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर करत आहे. निलेश याने यावेळी सुसाईड नोट लिहलेली आढळून आली यात त्यांच्या मृत्यू बद्दल कुणालाही दोषी धरू नये, मुलगा आर्यन ला सोबत नेत असल्याचे म्हटले आहे.

मुलाचा खून करून निलेश यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रुग्णालयात बखाल यांचे नातेवाईक व मित्र परिवाराची गर्दी झाली होती. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भाजप नगरसेविकेच्या पतीला पडले महागात; पोलीसांनी केली अटक
डान्सिंग डॉल म्हटलं म्हणून संतापल्या अमृता फडणवीस; राष्ट्रवादी नेत्यावर केला अब्रुनुसानीचा गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांना मोफत वडापाव देणार; फक्त करावे लागेल ‘हे’ काम