व्हाट्स अँपने भारत सरकारच्या विरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; घ्या अधिक जाणून

देशामध्ये सोशल माध्यमावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. सोशल माध्यमातून निर्माण झालेल्या वादामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. व्हाट्स अँपने भारत सरकारच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

आज दिनांक २६ मेपासून सुरु होणाऱ्या नियमांना स्थगिती देण्यात यावी यासाठी न्यायालयाचा दरवाजा व्हाट्स अँपने ठोठावला आहे. व्हाट्स अँप विरुद्ध भारत सरकार ही केस मंगळवारी कोर्टात फाईल केली गेली.

या नव्या नियमावलीमुळे युझर्सच्या हक्कांवर गदा येईल असे सांगण्यात आले आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सोशल मीडिया कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती.

भारतात या कंपन्यांनी कम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नेमावेत. तसेच त्यांचे कार्यक्षेत्र भारतात असावे असे त्यात सांगण्यात आले होते. त्यांनी सोशल माध्यमावर लक्ष ठेवून आक्षेपार्य कन्टेन्ट हटवण्याचे काम करावे असे सरकारने सांगितले होते.

व्हाट्स अँपच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, मेसेजिंग अँपला चॅट ट्रेस करायला सांगणे, यामुळे लोकांच्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनला धक्का बसेल आणि लोकांची गोपनीयता यामुळे धोक्यात येऊ शकते. याच सोबत युझर्स सुरक्षित राहावेत म्हणून आम्ही भारत सरकारसोबत संवाद करू इच्छित आहोत.

व्हाट्स अँप आपल्या खाजगी गोष्टींवर गदा येईल अशा गोष्टीना कायम विरोध करत आले आहे आणि भविष्यात पण या गोष्टीना व्हाट्स अँप विरोध करत राहणार आहे. गुगल आणि फेसबुकने मंगळवारी म्हटले होते की ते नवीन नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्या
पैशांसाठी जुही चावलाने केले होते जय मेहतासोबत लग्न?

रामदेवबाबांना डॉक्टरांचे ते वक्तव्य भोवणार, IMA ने पाठवली १००० कोटीची नोटीस

…म्हणून सावत्र बहीणींच्या लग्नाला गेले नव्हते सनी आणि बॉबी देओल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.