कंगनाचे जे काही सुरूय ते स्वत:साठीच, ती सुशांतच्या बाजूने बोलत नाही; वकीलांचा दावा

मुंबई । सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला आहे. दोन महत्वाचे साक्षीदार सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि स्वयंपाकी नीरज या दोघांना घेऊन सीबीआयचे पथक आज सुशांतच्या निवासस्थानी आज गेले होते.

सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी आता अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. कंगनाने या प्रकरणी बॉलीवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरुन अनेक जणांवर आरोप केले होते.

सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी आता अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंगनाने मांडलेले मुद्दे बरोबर असतील. सुशांतलाही घराणेशाहीचा त्रास होत असेल.

या प्रकरणी मात्र, कंगना ही सुशांतचे प्रतिनिधित्व करीत नाही. ती जे काही करीत आहे ते तिच्यासाठीच करीत आहे. कंगनाचे ज्यांच्याशी वैर होते त्यांना ती लक्ष्य करीत आहे.

सुशांत प्रकरणात या मुद्द्याला प्राधान्य नाही. यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या गँगने सुशांतला कसे संपविले हाच महत्वाचा मुद्दा आहे. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता.

या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यामध्ये सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.