“एवढ्या रात्री ती काय करत होती? तिचे कपडे चुकले असतील! सगळं तिचंच चुकलं असणार”

मुंबई। साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जिकडे तिकडे घडलेल्या घटनेनंतर संतापजनक वातावरण निर्माण झालं आहे. राजकीय, मनोरंजन सर्वच क्षेत्रातील कलाकार, राजकीय नेते, सामान्य नागरिक सर्वच घडलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त करत आहेत.

एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे एका टेम्पोचालकाने लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान आता अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या भावनांना वाट मोकळी केली असून पुन्हा एकदा समाजात स्त्रीलाच दोषी ठरवलं जाईल असं म्हटलं आहे.

हेमांगी कवी कायम आपल्या वक्त्यव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असते. व आताही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या त्या पोस्टमध्ये हेमांगीनं काही निरिक्षणं नोंदवली आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4872740619412195&id=100000289144138

त्यात ती म्हणते, आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती?, तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती?, किती कमवत होती?, लग्न झालेली होती, single होती, divorcee होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तिचंच चुकलं असणार! चला आता आपण तिलाच आणखीन घाबरुन ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय? अशा शब्दांत हेमांगीने तिच्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

मुंबईत साकीनाका येथे झालेल्या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. खैरानी रोड परिसरात ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. व त्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेत पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. आता आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र खवळला असून आता मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बांधणार हाती घड्याळ; लवकरच करणार पक्षप्रवेश 
काय डोकं आहे! चक्क फिल्मी अंदाजात चमचाने बोगदा खाणुन कैदी तुरुंगातुन फरार
महाराष्ट्रात ढगफूटीचा कहर! आतापर्यंत देशात एक नंबर; वाचा तज्ञांचा इशारा 
लाडक्या बाप्पासमोर केतकी माटेगावकरने गायले गाणे; ऐकून तुम्हीही भारावून जाल..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.