VIDEO, काय म्हणावं या पोराला! मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड

मुंबई। मुंबईकरांचं संपूर्ण जीवन हे घडाळ्याच्या काट्यावर फिरत असत. रोजच्या धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना साथ देते ती लोकल, मेट्रो, मोनो किंवा बस. कुठे फिरायला जायचे असेल किंवा कामाला जायचे असेल तर सगळेच लोक याचा वापर करतात.

मात्र दिवसभर थकून भागून बसमध्ये किंवा लोकल मध्ये अनेकांना बसायला जागा मिळत नाही. जागा नसल्याने अनेक लोक उभ्यानी प्रवास करतात. लोकलमध्ये किंवा बसमध्ये बसायला जागा मिळणं हे मुंबईकरांसाठी अर्ध सुख आहे.

हेच सुख मिळवण्यासाठी एका व्यक्तीने भन्नाट नाटक करून मेट्रोमध्ये बसण्यासाठी जागा मिळवली आहे. व त्याच्या या भन्नाट कल्पनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, तरुण अचानक थरथर कापताना दिसत आहे. मध्येच थांबतो त्याला असं कापताना पाहून सर्वजण त्याला बसण्यासाठी जागा रिकामी करून देतात. तो जागेवर बसतो आणि पुन्हा तशीच नक्कल करतो.

पुढच्या काही सेकंदात हा तरुण नॉर्मल मोडवर येतो असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तरुणाचा हा जुगाड पाहून अनेकांनी हा व्हिडिओ पाहून हसू येत आहे. या तरुणाला त्या जुगाडानंतर सीट देखील मिळते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. अनेकांनी या तरुणाचे कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या
त्यादिवशी अंधश्रद्धेमुळे ९०० पेक्षा जास्त लोकांनी केली होती आत्महत्या; जाणून घ्या ‘त्या’ भयानक घटनेबद्दल
‘या’ शहरात मिळत आहेत फक्त 12 रुपयांमध्ये घर
कोण तुषार भोसले? त्याची अवकात काय मोठ होण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर टीका करतात – प्रशांत जाधव
ठरलं! लोकसभेला ४०० जागा कशा जिंकायच्या, प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्यात बैठक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.