मुंबई | आयुष्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहणे. अनेक जण चांगली नोकरी मिळवण्यासाठी खुप मेहनत घेत असतात. नोकरी मिळवून आपल्या कुटूंबाचा सांभाळ करता यावा यासाठी दिवसरात्र एक करत नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करत असतात.
नोकरी मिळण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे. त्याचबरोबर हे मी मिळवणारचं अशी जिद्द मनामध्ये पाहिजे. आज तुम्हाला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. त्या वाचून तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यावर जॉब मिळणारंच. चला तर मग जाणून घेऊया त्या टिप्स…
बायोडाटा
इंटरव्ह्यूला जाताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा बायोडाटा. तुमच्या बद्दल असलेली माहिती यामध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेली असली पाहिजे. यामध्ये तुमचे शिक्षण, स्वत: ची संपुर्ण माहिती, छंद, आवडनिवड, तुम्ही आतापर्यंत काम केलेल्या कंपन्याची माहिती, अनुभव अशी सर्व माहिती लिहिलेली हवी.
मनात भिती बाळगू नका
इंटरव्ह्यूला जाताना मनात कोणतीच भिती बाळगू नका. समोरच्या व्यक्तीने प्रश्न विचारल्यावर प्रश्नांची उत्तरे न घाबरता देता आली पाहिजे. जर तुम्ही घाबरला तर विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे देता येणार नाहीत.
कपडे नीटनीटके आहेत का ते पाहावे
तुमच्या राहणीमानावरून, कपड्यांवरून कधीकधी नोकरी मिळेल का नाही हे अवलंबून असतं. कपडे साधे आणि इस्त्री केलेले असावे. जर कपडे व्यस्थित नसतील तर तुम्ही आळशी आहात, तुम्हाला कामात रस नाही असं समजून तुम्हाला नोकरी देण्यासाठी नकार देतील. त्यामुळे तरूणांनी पॅन्ट शर्ट आणि तरूणींनी साडी किंवा पंजाबी ड्रेस घालून गेलं पाहिजे.
इंटरव्ह्यूच्या ठिकाणी वेळेत जा
इंटरव्ह्यूला वेळेत गेलं पाहिजे. कधी कधी तुम्हाला नोकरीची गरज आहे की नाही हे पाहण्यासाठी इंटरव्ह्यूला वेळेच्या आधी कितीवेळ पोहोचता हे सूध्दा पाहिलं जातं. त्यामुळे घरातून लवकर निघून वेळेच्या आधी जाण्याचा प्रयत्न करा.
आत्मविश्वास
सर्वांपेक्षा चांगला इंटरव्ह्यूला देऊन नोकरीसाठी माझीच निवड झाली पाहिजे हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. आपल्यामधील चांगले गूण इंटरव्ह्यूला घेणाऱ्याला दाखवून दिले पाहिजेत.
वरील सर्व गोष्टींचे पालन केल्यावर तुम्हाला चांगली नोकरी मिळण्यास काहीच अडचण येणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘मोदी सरकारने डिझेलच्या करातून २१ लाख कोटी कमावले’
‘माझ्या मुलीला ड्रग्ज प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याने अडकवलं’
सुशिक्षित बेरोजगार! शिपाई पदाच्या अवघ्या १३ जागांसाठी २७००० उच्च शिक्षितांचे अर्ज
राहुल वैद्यला मागे टाकत रुबीना दिलैक ठरली बिग बॉस १४ची चॅम्पियन…