कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर काय करावे ? वाचा सविस्तर..

सध्या कोरोनाने लोकांना हैराण करून सोडले आहे. कोरोनाची भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. पण जर तुम्ही एक दोन दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर काय कराल ? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का ? याचे उत्तर आज आपण जाणून घेऊया.

कोणतीही व्यक्ती जर कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आली तर ती व्यक्ती भीतीने लगेच कोरोनाची टेस्ट करून घेते. पण टेस्ट कधी करायची यामागे एक विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता जर टेस्ट केली तर टेस्ट निगेटिव्हच येणार. कारण ती वेळ चुकीची असते.

कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर लगेच आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत किंवा लगेच आपल्यामुळे दुसऱ्याला कोरोनाची बाधा होत नाही. त्यामुळे नेमकी टेस्ट कधी करायची हे आधी समजून घेतले पाहिजे.

कोरोना व्हायरस हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरतो. पण हा प्रसार फक्त तेव्हाच होतो जेव्हा आपण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या खूप जवळून संपर्कात आलो असेल. कारण लागण झालेल्या व्यक्तीच्या श्वसनसंस्थेतल्या द्रव्याच्या थेंबामध्ये कोरोनाचे व्हायरस असतात.

माणूस खोकताना, शिंकताना किंवा बोलताना त्यांच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे हे व्हायरस बाहेर पडतात आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. मास्क आणि शारीरिक अंतराचे पालन केले तर लागण होण्याची शक्यता फार कमी आहे.

६ मीटरपेक्षा कमी अंतर आणि १५ मिनिटापेक्षा जास्त वेळ आपण जर त्या व्यक्तीच्या संपर्कात असलो तरच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असते. कोरोनाची लागण झाल्यानंतर साधारण लक्षणे दिसायला साधारण १४ दिवसांचा कालावधी लागू शकतो. बहुतेक रुग्णांमध्ये ५ दिवसांत लक्षणे दिसतात.

शिवाय कोरोनाची लागण झाल्यानंतर ४ दिवसाने इतरांना आपल्यामुळे इतरांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असते. या चार दिवसांच्या आत कोरोनाची टेस्ट केली तर रिपोर्ट निगेटिव्हच येणार. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्या झाल्या लगेच टेस्ट करू नये.

पाच दिवसांनंतर लक्षणे दिसली तरच टेस्ट करणे योग्य ठरेल. पण जर ५ दिवसानंतर लक्षणे दिसली नाहीत तर पुढील १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. १४ दिवसानंतरही आपल्याला काहीच लक्षणे दिसली नाहीत तर तुम्ही कोरोनावर मात केली आहे असं समजा. मग तुम्ही आपल्या कामाला लागू शकता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.