Share

Rohini Khadse: निखिलच्या मृत्यूवेळी नेमकं काय घडलं होतं? रोहिणी खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “तेव्हा बाबा घरी..”

Rohini Khadse: राज्याच्या राजकारणात मोठं नाव असलेले आणि अनेक वर्षं मंत्रीपद भूषवलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सातत्याने आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे चर्चेत असतात. त्यांच्यावर निखिल खडसे (Nikhil Khadse) यांच्या मृत्यूप्रकरणी संशय घेतला जातो. मात्र यामागचं सत्य नेमकं काय आहे, त्या दिवशी निखिलबरोबर काय घडलं होतं, हे आता रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (NCP Sharad Pawar group) या पक्षाच्या नेत्या असलेल्या रोहिणी यांनी एका युट्युब मुलाखतीत हा सर्व प्रकार मांडला.

“बेडवर रक्ताच्या थारोळ्यात निखिल पडलेला होता”

रोहिणी यांनी त्या दिवसाची आठवण सांगताना म्हटलं, “1 मे 2013 ला खूप लग्नं होती. निखिलने दिवसभर अनेक लग्न अटेंड केली. घरी आल्यानंतर आई व रक्षा वहिनीबरोबर चहा घेतला आणि मग आपल्या खोलीत गेला. काही वेळातच बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. आई आणि वहिनी धावत रूममध्ये गेल्या तर निखिल बेडवर पडलेला होता, रक्त वाहत होतं. दोघींनी लगेच गावचे सरपंच नारायण चौधरी (Narayan Chaudhary) यांना आणि इतरांना फोन केला.”

त्यावेळी रोहिणी पुण्याला (Pune) होत्या, एलएलएमची अंतिम परीक्षा देत होत्या. एकनाथ खडसे मुक्ताईनगरात (Muktainagar) लग्नकार्याला गेले होते. घरात त्या वेळी निखिल, त्यांची पत्नी आणि आई सोडून कोणीच नव्हतं.

“घटना झाल्यावर बाबा घरी नव्हते, लोक उगाच राजकारण करत आहेत”

रोहिणी म्हणाल्या, “ज्यावेळी निखिलने आत्महत्या केली, त्यावेळी बाबा घरीच नव्हते. ही गोष्ट संपूर्ण गावासमोर घडलेली आहे. जेव्हा निखिलला अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकलं जात होतं, तेव्हा बाबा बाहेरून घरी पोहोचले. पण तरीदेखील लोक या घटनेचं राजकारण करत आहेत, हे वेदनादायक आहे.”

निखिल नैराश्यात होते का, यावर उत्तर देताना रोहिणी म्हणाल्या, “त्याला मणक्याच्या दुखण्यामुळे प्रचंड त्रास होता. डॉक्टरांनी ऑपरेशनचं यश निश्चित सांगितलं नव्हतं. त्यामुळे ऑपरेशन टाळण्यात आलं. पेन किलर घेतल्यावर थोडं बरं वाटायचं, पण त्रास पुन्हा सुरु व्हायचा. त्याची सहनशक्ती संपली होती.”

त्या दिवसाच्या आधी रात्री निखिलने रोहिणींशी फोनवर बोलून ‘माझ्याशी बोलायला ये’ असं सांगितलं होतं. रोहिणी म्हणाल्या, “माझी 13 मे रोजी परीक्षा होती. मी त्याला म्हटलं, पेपर झाल्यावर येते. पण कदाचित मी गेली असते तर हे टळलं असतं.” त्या वेळेस तो निर्णय घ्यावा लागला, याचं दु:ख वाटतं, असंही त्या म्हणाल्या.

या घटनेबाबत सुसाईड नोटबद्दल विचारल्यावर रोहिणी म्हणाल्या, “हे आधी ठरवून केलेलं नव्हतं. त्यावेळी तो एकटाच रूममध्ये होता. आई किचनमध्ये होती आणि रक्षा वहिनी नुकत्याच बाहेर पडल्या होत्या. बंदूक चालवली त्याच क्षणात त्याने निर्णय घेतला.”

“अडीच वर्षाच्या मुलासाठी आम्ही लढत राहिलो”

घटनेच्या वेळी निखिलचा मुलगा अडीच वर्षांचा होता. “तो एवढा लहान असताना त्याला वाढवताना आम्ही काय सहन केलं ते आम्हालाच माहीत आहे. पण लोकं फक्त राजकारणासाठी अशा गोष्टी उकरून काढतात”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now