‘हा काय मुर्खपणा सुरू आहे…’ भारतातील महिला अत्याचारांवर अभिनेत्रींचा उद्विग्न सवाल

मुंबई। मुंबईतील साकीनाका परिसरात दिल्लीतील निर्भयासारखा धक्कादायक प्रकार घडला होता. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जिकडे तिकडे घडलेल्या घटनेनंतर संतापजनक वातावरण निर्माण झालं आहे. राजकीय, मनोरंजन सर्वच क्षेत्रातील कलाकार, राजकीय नेते, सामान्य नागरिक सर्वच घडलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त करत आहेत.

एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे एका टेम्पोचालकाने लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान आता बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान, तापसी पन्नू, आलिया भट्ट, कल्कि केक्ला आणि अनुष्का शर्मा या सर्व बॉलीवूडमधील अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. करीना कपूरने पोस्ट शेअर करत तुटलेल्या हार्टचा इमोजी शेअर केला तर दुसरीकडे तापसी पन्नू नाराजी व्यक्त केली आहे.

तापसी म्हणाली, ‘आज कोणती बातमी… रोजची बातमी… सतत असचं घडत आहे… कारण तिने जगण्यासाठी लढा दिला होता… आपला जीवन वाचवण्यासाठी तिला बक्षीस मिळालं…’ असं तापसी म्हणाली. तर आलिया भट्ट म्हणाली की, ‘हा काय मुर्खपणा सुरू आहे. ही गोष्ट प्रचंड संतापजनक आहे…’ असं आलियाने म्हटलं आहे.

तसेच अभिनेत्री कल्कि केक्ला म्हणाली, ‘हाच एक मार्ग आहे का आरोपींचे गुन्हे उघडकीस आणण्याचे. ते लोक किती वर्षांचे होते? काय करत होते? त्यांनी केलेला हा पहिलाचं गुन्हा आहे? ही लोक आपल्या आसपास फिरत आहेत. आपल्याला त्यांना समोर आणायला हवं…’ असं केक्ला म्हणाली.

अशा पद्धतीच्या पोस्ट शेअर करत अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईमधील साकीनाका येथील घडलेल्या घटनेनंतर सर्वच हळहळ व्यक्त करत आहेत. मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

तसेच तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. व त्यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकारणात साधे राहणे गुन्हा आहे का? विजय रूपाणींच्या मुलीचा मोदींवर थेट निशाना 
राज ठाकरे यांचा ‘तो’ मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला! गृहविभागाला दिले तातडीचे आदेश…
काय सांगता! मुली भाव देत नाहीत म्हणून पठ्ठ्याने थेट आमदाराला पत्र लिहीत केली तक्रार
…म्हणून जावयाने सासुचे गुप्तांग दगडाने ठेचले; मुंबईतील भयानक घटनेने महाराष्ट्र हादरला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.