काश्मीरमधील व्हायरल होत असलेल्या या फोटोच्या मागचं नेमकं रहस्य काय ? वाचा सविस्तर…

श्रीनगर | काश्मीरमध्ये वारंवार दहशतवादी हल्ले सुरू असतात. त्यामुळे आपले अनेक जवान आणि स्थानिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्याही दोन तीन दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत.

यापूर्वी झालेल्या एका हल्ल्यात एका स्थानिक मुलाचा दहशतवाद्यांकडून मृत्यू झाला होता. आजही दहशतवादी हल्ल्यात एका व्यक्तीच्या मृत्यू झाला. अतिरेक्यांनी सोपोर येथे शासकीय सुरक्षा दलावर हल्ला केला होता.

फोटोत दिसणारा तोच व्यक्ती आहे आणि त्याच व्यक्तीचा हा छोटा मुलगा आहे. मुलगा ३ वर्षांचा आहे. त्याला याची कल्पनाही नाहीये की, आपल्या वडिलांसोबत नेमकं काय घडलं आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतरही बराच वेळ हा मुलगा वडिलांच्या अंगावर बसून होता. ‘द काश्मीरवाला’ या मॅगझीनचे संपादक फहाद शहा यांनी हा फोटो ट्विट करत लिहिले आहे ‘काश्मीरमधील जीवन’.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.