…म्हणून विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खास; जाणून घ्या या नावामागचा अर्थ

मुंबई | काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अनुष्काने सोमवारीच लेकीसोबतचा फोटो पोस्ट करून तिचे नाव जाहीर केले.

विशेष म्हणजे या बाळाचं नाव ऐकल्यानंतर त्या नावामागचा नेमकं अर्थ काय हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. खरं तर हे नाव ऐकल्यानंतर विराट आणि अनुष्का या दोघांचं नाव एकत्रित करुन वामिका हे नाव ठेवले असावे असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, या नावाचा एक खास अर्थ असून ते ठेवण्यामागे एक कारण आहे.

‘वामिका’ या नावाचा अर्थ ‘दुर्गा’ असा आहे. वामिका हे दुर्गा देवीचं आणखी एक नाव आहे. विराट- अनुष्काच्या घरात एका चिमुकलीने आगमन केल्यामुळे ती देवीचं रुप आहे असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं नाव वामिका ठेवले आहे.

विराटने अशी दिली होती आनंदाची बातमी..
कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती. विराटने ट्विटमध्ये म्हंटले होते की,”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आमच्या घरी कन्यारत्न आली. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो.

अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट,” असे ट्विट विराटने केले होते.

महत्त्वाच्या बातम्या
पाच तारखेलाच पगार झाला पाहिजे म्हणणाऱ्या शिक्षकांना अजित पवारांनी ‘या’ शब्दांत खडसावले
अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी केली जोरदार टीका, ‘देशाची संपत्ती गरीकांच्या हातात नसून…’
‘गरिबाला आणखी गरीब करु नका, महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्या’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.