वॅक्सीन घेतल्यानंतर ताप आला तर नेमकं काय समजायचं? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई। संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशातच कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मात्र ज्या नागरिकांनी कोरोना लस घेतली त्या नागरिकांना लसीकरणानंतर दुसऱ्या दिवशी अनेक समस्या जाणवू लागल्या.

काहींना चक्कर येत असल्याचे समोर आले, काहींना ताप भरला, तर काहींच्या डोळ्यासमोर अंधारी येते. मात्र हे असे लसीकरणानंतर का होते? अनेकांना ताप भरल्याने भीतीही वाटत असेल. मात्र याच नेमकं कारण काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.

ज्या लोकांना लस घेतल्यानंतर अशक्तपणा, डोकेदुखी, अंगमोडी असे त्रास जाणवू लागले तर, दुष्परिणामांचा अर्थ म्हणजे शरीराकडून लसीचा सकारात्मकपणे स्वीकार केला जात आहे.

ज्यांना लस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणवत नाहीत, त्यांची रोगप्रतिकार शक्ती लसीचा योग्य प्रकारे स्वीकार करत नाहीये, असा त्याचा अर्था होतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. अहवालानुसार, लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसायला हवेच, असं काही गरजेचं नाही. काहींना लस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणवत नाही.

पण त्यांची रोग प्रतिकारशक्ती ही दुष्परिणाम झालेल्यांसारखीच असते. तज्ज्ञांनुसार, लस घेतल्यानंतर एखाद्याला ताप आला नाही, तर त्याचा अर्थ असा की त्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती बळकट आहे. लस त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीला कोणत्याही प्रकारे बाधित करु शकत नाही.

परिणामी रोगप्रतिकार शक्तीमुळे संबंधित व्यक्तींमध्ये लस घेतल्यावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसत नाहीत.

महत्वाच्या बातम्या
पावसाचा बीडकरांना मोठा फटका; तब्बल 15 हजार क्विंटल साखल भिजली; कोट्यावधींचे नुकसान
अमिताभ बच्चनसाठी माधूरी दिक्षितने अनिल कपूरला सोडले; पण अमिताभने चित्रपट केला बंद
दोन डोसमधील अंतर कोणाच्या सांगण्यावरून वाढवले? तज्ञ म्हणाले, आम्ही शिफारस केलीच नाही
लय भारी! ‘मस्त चाललंय आमचं’, म्हणत शालूच्या डान्सने घातला सोशल मिडीयावर धुमाकूळ; एकदा पहाच..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.