नगरमधील डाॅक्टरच्या चिठ्ठीची संपूर्ण देशात चर्चा? असं काय लिहीलय त्या चिठ्ठीत? वाचा..

अहमदनगर | कोरोनाने गेल्या वर्षभरापासून हाहाकार  माजवला आहे. कोरोना काळात अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. वाढत्या  कोरोना रुग्णसंख्येने चिंतेची लाट पसरली आहे. कोरोनाच्या भीतीने  प्राणही गमावले आहेत.

कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलिस कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. यामुळे या कोरोना योध्दांचे कौतूक होत आहे. रुग्ण आजाराला घाबरू नये म्हणून डॉक्टरांकडून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात  डॉ. कोमल कासार आणि युवराज कासार यांचे संजीवनी हॉस्पीटल आहे. त्यांनी रुग्णांना एक संदेश दिला आहे. प्रिस्क्रिप्शनवर डॉ. कासार  लिहितात  की आजारातून बरा झाल्यानंतर १ झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही. असा संदेश डॉक्टरांनी दिला आहे.

डॉक्टर युवराज कासार म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे सतत फोन येत असतात. ऑक्सिजन, इंजेक्शनची काय व्यवस्था होईल का अशी विचारणा केली जाते. आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. परंतू काही गोष्टी आमच्याही हातात नाहीत.

डॉ. कासार पतीपत्नी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेत असतात. तसेच रुग्ण बरा झाल्यानंतर प्राणायम, योगासन, योग्य आहार, मनशांत ठेवण्याचा सल्ला देतात. कासार दामपत्याचे परिसरात कौतूक केले जात आहे.

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. राज्यात आज ६७ हजार १६० कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर आज ६७६ रुग्णांनी जीव गमावला आहे. आज ६३,८१८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
जीव गेला तरी बेहत्तर, पण व्यसन जाणार नाही! व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा तंबाखु मळतानाचा विडिओ बघाच
पतीला ऑक्सिजन न मिळाल्याने रिक्षातच तोंडाने श्वास देत राहिली पत्नी; मात्र कोरोनाने गाठलचं
लोकांना खायला अन्न नाही, अन् तुम्ही पैसे उडवता! लाजा वाटूद्या; अभिनेत्यांवर नवाजूद्दीन संतापला
जामखेडच्या डॉक्टरांचा नाद नाय! ना रेमडेसिवीर, ना महागडी औषधं, तरी कोरोना रुग्ण झटपट बरे

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.