काय सांगता! हा तरुण लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा करतोय तयार

सध्या कोरोनामुळे मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मास्कमुळे तयार होत असलेला कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काळात पीपीई आणि मास्कमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढल्यास मोठी समस्या उभी राहू शकते.

अशावेळी कचरा रिसायकल केल्यास आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकतो. असाच प्रयत्न एका तरुणाने केला आहे आणि त्यातून ते लाखो रुपये मिळवत आहेत. बिनिश देसाई असे त्यांचे नाव आहे.

बिनिश यांच्या कामामुळे यांना रिसायकलमॅन असे म्हटले जात आहे. हे BDdreams या कंपनीचे संस्थापक आहेत. इंडस्ट्रीअल वेस्टला सस्टेनेबल बिल्डींगचे साहित्य तयार करण्यासाठी या तंत्राचा वापर करतात.

द बेटर इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार बिनिश Pblock 2.0 नावाची वीट तयार करत आहेत. ही वीट कोरोना विषाणूपासून बचावसाठी वापरात असलेल्या बायोमेडिकल वेस्टपासून तयार होते.

अनेकजण मास्कचा वापर एकदाच करतात. भारतात दिवासाला 101 मिट्रीक टन बायोमेडिकल कचरा निर्माण होतो. सध्या कोरोनाच्या माहामारीमुळे या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.

बिनिश यांनी सांगितले की, जास्तीत जास्त लोक मास्कचा एकदाच वापर करतात. त्यामुळे या कचऱ्यापासून वीटा तयार केल्या जाव्यात अशी कल्पना मला सुचली.

या वीटा वॉटरप्रुफ आहेत. Pblock 2.0 वीट तयार करण्यासाठी 52 टक्के पीपीई मटेरिअल, 45 टक्के ओले कागदांचा वापर करण्यात आल्या आहेत. या वीटांची किंमत २.८ लाख रुपये इतकी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.