काय सांगता! या मुस्लीम देशाच्या नोटांवर आहे गणपती बाप्पाचा फोटो

जगात एक असा देश आहे तोही मुस्लीम देश ज्या देशातल्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात आला आहे. होय जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामधल्या नोटेवर गणपतीचा फोटो छपाण्यात आला आहे.

इंडोनेशिया देशातला व्यवहार हा रुपयांमध्येच होतो. इंडोनेशियामधील २० हजार रुपयाच्या नोटेवर पुढच्या बाजूला गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे.

नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली. त्यानंतर २० हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय झाला. या नंतर नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला.

येथील लोकांचे म्हणणे आहे की जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. इंडोनेशियात मुस्लीम लोक मोठ्या प्रमाणावर आहेत.

या देशात हिंदूंचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. या देशातल्या २० हजाराच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गणपतीला या देशात कला, विज्ञान, शिक्षण याची देवता मानले जाते.

सध्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. जगातील अनेक देशांमध्ये गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.