काय सांगता! नवरा भांडण करत नाही म्हणून बायकोने थेट मागितला घटस्फोट

 

संभळ | लग्नानंतर नवरा बायकोचे भांडण होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र लग्नला दीड-दोन वर्षे होऊनही जर एकही भांडण होत नसेल तर मात्र त्यांचा संसार सुखात सुरू असल्याचे म्हटले जाते.

मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक अचंबित करणारीच घटना घडली आहे. नवरा कधीही भांडण करत नसल्याने एका पत्नीने थेट न्यायालयात याचिका दाखल करून घटस्फोटाची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील संभळ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पत्नीचे असे म्हणणे आहे की, तिचा नवरा तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो, तो कधीही भांडण करत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी तिला राहण्याची इच्छा नाही.

या लग्नाला १८ महिने झाले आहे. माझा पती नेहमी माझ्यावर प्रेम करतो कधी भांडत नाही, प्रत्येक गोष्ट एकूण घेतो. जेवण बनवतो त्यासोबत घरची कामेही करतो, अशा ठिकाणी माझा जीव गुदमरत असल्याचे सांगत तिने घटस्फोटाची मागणी केली आहे.

महिलेच्या घटस्फोटाच्या मागणीला मात्र न्यायालयाने फेटाळले आहे. हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही असे म्हणत न्यायालयाने त्या महिलेची याचिका फेटाळली आहे.

दरम्यान, न्यायालयाने मागणी फेटाळल्यानंतर तिने पंचायतीत आपल्या घटस्फोटाची मागणी केली. मात्र पंचायतने देखील हे प्रकरण आपल्या मर्यादेच्या बाहेरचे म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.