सुरू होतेय गाढवीनीच्या दुधाची डेअरी, एका लिटरची किंमत ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली । भारतामध्ये गाय, म्हैस किंवा बकरी या दुधाळ प्राण्यांचे पालन केले जाते बहुतांश लोक गाय, म्हैस, बकरीचे दुध पितात, अगदी ऊंटाचे दुधसुद्धा काहींनी सेवन केल्याचे ऐकले असेल.

पण देशात प्रथमच असे होत आहे जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. होय, आतापर्यंत तुम्ही गावात गाय, म्हैशीच्या दुधाची डेअरी पाहिली असेल, परंतु लवकरच गाढवीनीच्या दुधाची डेअरी सुद्धा सुरू होत आहे.

देशात राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र हिसारमध्ये गाढवीनीच्या दुधाची डेअरी सुरू होत आहे. एनआरसीई हिसारमध्ये हलारी जातीच्या गाढवीनींच्या दुधाची डेअरी सुरू होत आहे.

ज्यासाठी अनेक जातीच्या गाढवीनी अगोदरच मागवल्या आहेत. सध्या त्यांचे ब्रीडिंग केले जात आहे.
गाढवाला आजपर्यंत तुम्ही गंमतीचे पात्र समजत होतात, पण आता तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील.

कारण गाढवीनीचे दूध माणसांसाठी खुप जरूरी आहे. शरीराची इम्यून सिस्टम ठिक करण्यात ते महत्वाची भूमिका बजावते.

गाढवाची ही जात गुजरातमध्ये आढळते. ज्याचे दूध औषधांचे भांडार समजले जाते. हलारी जातीच्या गाढवीनीच्या दुधात कँसर, लठ्ठपणा, अ‍ॅलर्जी यासारख्या आजारांशी लढण्याची क्षमता असते.

गाय किंवा म्हैशीच्या दुधाने छोट्या मुलांना अ‍ॅलर्जी होते, पण हलारी जातीच्या गाढवीनीच्या दुधाने असे होत नाही. गाढवीनीच्या दुधात अँटीऑक्सिडेंट, अँटीएजिंग तत्व आढळतात. शिवाय दुधात फॅट नाममात्र असते.

हाय डेयरीचे काम लवकरच सुरू होणार आहे. गाढवीनीचे दुध बाजारात 2000 ते 7000 रुपये प्रति लीटरपर्यंत विकले जाते. याद्वारे ब्यूटी प्रॉडक्ट्ससुद्धा बनवले जातात, जे खुप महाग असतात.

गाढवीनीच्या दुधापासून साबण, लिपबाम, बॉडीलोशन तयार केले जाते. त्यामुळे लवकरच हे दूध बाजारात उपलब्ध होईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.