काय सांगता! एलियनने केलं चक्क तरुणीचं अपहरण, त्यानंतर जे झालं ते तुम्हीच वाचा

ब्रिटन। परग्रहावरचे जीव म्हणजेच एलियन्स आपण आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहेत. मुळात ते असतात की नाही हे कित्येकांना माहित देखील नाही. मात्र एलियन्स असतात हे अनेकजण कल्पना करत असतात. मात्र तुम्हाला कोणी सांगितलं की, एक तरुणी एलियनच्या प्रेमात पडली आहे, व ती त्याला भेटते ती डेट करते तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना.

मात्र ब्रिटनमधल्या एका महिलेचा असा दावा आहे की, तिच एलियनने अपहरण केले होते, व त्यानंतर ती त्या एलियनच्या प्रेमात देखील पडली आहे. व ती आता पुन्हा त्याच्यासोबाबत कधी डेट करायला मिळेल याची वाट पाहत आहे. डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं नाव एबी आहे.

एबीने सोशल मीडियावर असं लिहिलं होतं, की पृथ्वीवरच्या पुरुषांचा आपल्याला कंटाळा आला आहे. त्यामुळे आता एखाद्या एलियनने आपलं अपहरण करावं, असं आपल्याला वाटतं. योगायोगाने त्यानंतर एबीला रात्री स्वप्नात पांढरा प्रकाश दिसू लागला.

एका रात्री तिला स्वप्नात एक आवाज ऐकू आला आणि ‘नेहमीच्या जागेवर वाट पाहा’ असं त्या आवाजाने तिला सांगितलं. तिला ते खरं वाटलं नाही. पण ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी नेहमीप्रमाणे उघड्या असलेल्या खिडकीच्या शेजारी बसली होती. नंतर ती झोपायला जाणार तेवढ्यात तिला बाहेर एक उडती तबकडी दिसली.

त्या तबकडीतून एक चमचमता हिरवा प्रकाश तिला दिसला. तो प्रकाश आपल्याला उडत्या तबकडीपर्यंत घेऊन गेला, असं एबीने सांगितलं. त्यानंतर एबीने पुरुषांची तुलना एबीसी केली आहे. एलियन्स पृथ्वीवरच्या पुरुषांपेक्षा खूप चांगले आहेत, अस तिने सांगितलं. आपल्या प्रियकर एलियनसोबत पुढच्या डेटची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, असंही एबीने सांगितलं.

तिच्या या आश्चर्यकारक दाव्यामुळे सगळेच अचंबित झाले आहेत. मात्र हे संपूर्ण एका कथानक सारखं वाटत त्यामुळे अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही यासाठी तिने एलियनचं वर्णन केलं आहे. ती म्हणाली, ‘मला जे एलियन्स भेटले, ते माणसांसारखेच होते. परंतु खूच उंच आणि सडपातळ होते.

एलियन्सनी आपलं अपहरण केलं आणि 20 मिनिटांनी आपल्याला सुरक्षित परत घरी आणून सोडलं. ‘एलियन पुन्हा कधी येईल, याची मी वाट पाहत आहे. कारण मला त्याच्याबरोबर अँड्रोमेडा आकाशगंगेची सफर करायची आहे,’ असं एबीने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या
हुंड्यासाठी नवविवाहित पत्नीला शिवीगाळी करत बेदम मारहाण, अखेर तिने उचललं असं पाऊल की…
तारक मेहताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दया बेनची भूमिका
तरुणीला अंघोळ करताना दिसलं असं काही कि अचानक लागली ओरडू, पहा हा व्हिडिओ
विकृतीचा कळस! भल्या मोठ्या किंग कोब्राला पकडले आणि त्याच्यावर उभे राहून…, पहा भयानक व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.