काय सांगता! इस्राईलमध्ये सापडले 1000 वर्ष जुन्या कोंबडीचे अंडे, मात्र पुढे असं झालं की…

नई दिल्ली। पृथ्वीवर असंख्य जीव आहेत ज्यांचा हजारो वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. काही शोध असे आहेत जे अनेक शोध घेतल्यानंतर त्यांचे अवशेष सापडले आहेत. त्या अवशेषांचे परीक्षण केल्यावर किंवा त्याचा अभ्यास केल्यावर कळत की, कोणता जीव आहे आणि तो किती जुना आहे.

अशा प्रकारे अनेक अवशेष उत्खननातही आढळतात. असच इस्रायलमध्ये 1000 वर्ष जुन्या कोंबडीचे अंडे सापडले आहे. हे जगातील सर्वात प्राचीन अंड असल्याचे सांगितले जात आहे. दुर्दैवाने साफसफाईच्या दरम्यान अंड फुटलं.

असे सांगितले जात आहे की हे अंडे दहाव्या शतकातील आहे. आणि मध्य इस्राईलमधील यवणे शहरात उत्खनन दरम्यान ते सापडले होते. यवने शहरात नगरविकास प्रकल्प सध्या सुरू आहेत.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे अंडे सुरक्षित आढळले परंतु नंतर साफसफाई दरम्यान ते फुटलं आहे.

इस्त्रायली पुरातत्व विभागाचे विभागाने सांगितले आहे की, “यवणे येथील पुरातत्व उत्खननादरम्यान सुमारे 1000 वर्ष जुना कोंबडीची अंडी सापडले आहे. इस्राईलमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हा एक अत्यंत दुर्मिळ शोध आहे. हे अंडे दहाव्या शतकातील पुरातत्व साइटवरून सापडले आहेत.

पुरातत्वशास्त्रज्ञांना या मंदिराच्या आत इस्लामिक काळाचा एक मलकुंड सापडला आहे. या मलकुंडात खोदताना हे अंडे पडले होते. अंडी मानवी विष्ठा मध्येच होती आणि यामुळे ते सुरक्षित राहिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.