टीम इंडियाला चारीमुंड्या चीत करणाऱ्या बॉलरला दोन वेळच जेवण मिळेणा, अश्विनने केले मदतीचे आवाहन

वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन सध्या हालाखीचे जीवन जगत आहे. त्यांच्याकडे दोन वेळचे अन्न खायलाही पैसे नाहीत. क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर पॅट्रिक पॅटरसन या नावाला लोक विसरले आहेत. त्यांची अवस्था पाहून भारतीय क्रिकेटर आर. अश्विन भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे.

एका भारतीय पत्रकाराच्या रिपोर्टनंतर पॅट्रिक पॅटरसन जगासमोर आले. २०१७ मध्ये क्रिडा पत्रकार भरत सुंदरसान टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावेळी वेस्ट इंडीजला गेले तेव्हा त्यांना पेटरसन सापडले होते. आता सुंदरसान यांनी पॅटरसन यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती दिली आहे. पॅट्रिक पॅटरसन येंचे दैनंदिन कामही कालांतराने खालावत असल्याचे सुंदरनेसन यांनी ट्विट करत म्हटले होते.

पॅट्रिक पॅटरसन हे किराणा सामान विकत घेऊ शकत नाहीत. किंवा ते दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यास असमर्थ आहेत. क्रिकेट विश्वातील लोकांनी त्यांच्यावर प्रेम दाखवा असे सुंदरसान यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

दरम्यान, क्रिडा पत्रकार सुंदरसन यांनी दिलेली माहिती समजताच आर. आश्विन भावुक झाला. त्याने ट्विट करत लिहिले की, पॅट्रीक पॅटरसन द ग्रेट यांना रोजच्या जगण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. भारतीय चलनामध्ये त्यांना मदत करण्याचा कोणताही पर्याय नाही. कुणाला मदत करणे शक्य असेल, तर कृपया करावी. असं भावनिक आवाहन अश्विननं केलं आहे.

पॅट्रीक यांनी २८ टेस्टमध्ये ९३ विकेट्स घेतल्या आहेत. १९८७ साली दिल्लीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी टीम इंडियाला चांगलाच धक्का दिला होता. त्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पॅट्रीक यांनी २४ रन देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या बॉलिंगमुळे टीम इंडिया अवघ्या ७५ धावांवर ऑल आऊट झाली होती. तर पॅट्रीक पॅटरसनच्या त्या कामगिरीमुळे वेस्ट इंडीजने दिल्ली टेस्ट जिंकली होती.

तेव्हा पॅट्रीकच्या बॉलचा सामना करण्यास अनेक फलंदाजांना भीती वाटत होती. त्यांनी ५९ वन-डे सामन्यात ९० विकेट्स घेतल्या आहेत. पॅट्रीक यांनी घेतलेल्या आश्चर्यकारक विकेट्सच्या अनेक व्हिडीओ आजही यु-ट्यूबवर पाहायला मिळतात.

महत्वाच्या बातम्या-
पहिल्या डोसनंतर ‘या’ कोरोना लसीतून जास्त अँटीबॉडीज तयार होतात; ICMR च्या प्रमुखांचा दावा
जाणून घ्या, देशातील पाच भितीदायक रेल्वे स्टेशनबद्दल आणि त्यांच्या संबंधित असलेल्या घटनांबद्दल
द वॉल राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, बीसीसीआयकडून माहिती  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.