बंगालच्या वाघिनीने उडवला भाजपचा धुव्वा; ममतांच्या तृणमूलची विजयी आघाडी

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीचे काही कल हाती लागले आहेत. सध्या पश्चिम बंगालवर सगळ्या लोकांचे लक्ष आहे. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींमध्ये कांटेंकी टक्कर होताना दिसत आहे.

पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणूकीत भाजप आणि तृणमुलमध्ये चुरशीची लढाई होताना दिसत आहे. पहिल्या पोस्टल मत मोजणीमध्ये एकेकाळचे ममता यांचे सहकारी सुवेंदू अधिकारी हे पुढे आहेत.

मतमोजणीला अडीच तास झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने १८१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप १२० जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. भाजप आणि तृणमूल काँग्रेस आघाडीवर असलेल्या जागांमध्ये जास्त फरक नव्हता. परंतु आता भाजपची गाडी ९४ जागांच्या पुढे सरकताना दिसत नाही.

महत्वाचे म्हणजे देशभरात जवळपास ८२२ मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली आहे. यापैकी नंदीग्राम ही अशी एकच सीट आहे जी या साऱ्यांवर भारी पडणार आहे. नंदीग्रामची जागा २००९ पासून तृणमुलच्या ताब्यात आहे.

२०१६ पासून तिथे तृणमुलच्या खात्यात ८७ टक्के मतदान झाले आहे. सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमच्या अब्दुल कबीर यांचा ८१ हजार २३० मतांनी पराभव केला होता. हाच मतदारसंघ बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे.

सध्या नंदीग्राम मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी ८१०६ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपशी दोन हात करण्यासाठी ममता बॅनर्जी पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप पुर्ण पश्चिम बंगाल काबीज करण्याच्या इर्षेने मैदानात उतरले आहे.

विधानसभेच्या २९४ जागांसाठी बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी १४८ ही मॅजिक फिगर मानली जाते. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
पोलार्डच्या वादळात चेन्नई भूईसपाट; मुंबईच्या वाघाने चेन्नईच्या तोंडातील विजय खेचून आणला
पोलार्डच्या वादळात चेन्नईचा पालापाचोळा; २१९ धावांचा पाठलाग करत मुंबईकडून चेन्नईचा धुव्वा
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, हॉटस्टार बरोबर पण केलाय सौदा पक्का
नगरमध्ये महिलेने शेतात सापडलेला बॉम्ब मुलाकडे दिला, अन पुढे जे झालं त्यानं अख्ख नगर हादरल   

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.