ममता सरकारमधील मंत्र्याच्या घरावर सीबीआयची धाड; मंत्र्यासह दोन आमदारांना घेतले ताब्यात

कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता पश्चिम बंगाल राज्याची निवडणूक पार पाडली. तिथे तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार परत सत्तेवर आले आहे. सीबीआयने पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री फिरहद हकीम यांच्या घरावर छापा घातला आहे.

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. असे पण सांगण्यात आले आहे की फरहाद हकीम यांना सोडून सीबीआयने सुब्रत मुखर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोव्हान चटर्जी यांना त्यांच्या कार्यालयात नेले आहे.

९ मे २०२१ ला राज्यपाल जगदीश घनखार यांनी या चार नेत्यांच्या विरोधात सीबीआय खटला चालविण्यास परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षात शारदा घोटाळा आणि नारद घोटाळा सातत्याने चालू आहे. यामध्ये सीबीआयदेखील तपास करत आहे.

या प्रकरणामध्ये वेग वगेळ्या नेत्यांची नवे पुढे आलेली आहेत. पश्चिम बंगाल राज्यात २०१६ विधानसभा निवडणुकीपूर्वी नारद स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आल्या. या स्टिंग ऑपरेशनमध्ये टीएमसी मंत्री, खासदार आणि आमदारांसारख्या दिसणार्‍या व्यक्तींना कंपनीच्या प्रतिनिधींकडून पैसे घेताना पाहण्यात आले.

नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू शमुवेलने स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप आहे. हे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर राज्यासोबतच संपूर्ण देशात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या स्टिंग ऑपरेशनमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांचे नाव पुढे आले. त्यात प्रामुख्याने या स्टिंगमध्येच फिरहद हाश्मी सुब्रत मुखर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोव्हान चॅटर्जी यांची नावे समोर आली आहेत.

ताज्या बातम्या
गोमूत्र पिल्यामुळे मला कोरोना झाला नाही; भाजप खासदाराचा दाव्याने उडाली खळबळ

जुही चावला, माधूरी दिक्षितसोबत ‘या’ अभिनेत्री चित्रपटाच्या शुटींग वेळी होत्या गरोदर

खुपच रागीट होती तब्बूची बहीण फराह नाज, रागात चंकी पांडेला केली होती मारहाण; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.