शहाणपणा करायला गेला आणि आजीच्या जाळ्यात फसला, पहा भन्नाट व्हिडीओ

मुंबई। सोशल मीडिया म्हटलं तर चर्चा होणारचं. मात्र एक आजी एवढी प्रसिद्ध होईल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण आजी? कुठली आजी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतीलच.

मात्र आज आपण असा एक व्हिडिओ पाहणार आहोत ज्यात एका वयोवृद्ध आजीने आपली शक्कल लढवून एका तरुणाला बरोबर जाळ्यात ओढलं आहे. व या सर्वाचा सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/reel/CQfvRLjDuYp/?utm_medium=copy_link

हा व्हिडीओ आजीबाई आणि या तरुणाने शूट करून व्हायरल केला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एका आजीबाईने चांगलंच डोकं लावलं आहे. यामध्ये आजीबाईने एक प्लास्टिकचे टोपले घेतलेले आहे. हे टोपले आजीबाईने घराच्या छताला लावलेले असून त्याला एका लोखंडी रॉडने पकडले आहे.

आवाज दिल्यानंतर थोड्या वेळाने एक तरुण घरातून आला आहे. त्याने आजीला मदत म्हणून छताला लावलेले प्लास्टिकचे टोपले पकडले आहे. नातवाने टोपले पकडल्यानंतर आजीबाई पटापट खाली उतरली आहे. खाली उतरताच प्लास्टिकचे टोपले धरून ठेवलेल्या नातवाच्या खिशावर आजीने चांगलाच हात मारला आहे.

आजीबाईने आपल्या नातवाच्या खिशातून एक मौल्यवान वस्तू काढली आहे. तसेच त्या वस्तूला बॅगमध्ये टाकून ही आजी पसार झाली आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व काहींना व्हिडिओ बघून हसू आवरत नाहीय तर काहींनी आजीबाईच कौतुक केलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.