‘लॉकडाऊन नकोच, आम्हाला आमच्या नशीबावर सोडा’

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन लावण्यात येण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  मात्र, पुन्हा लॉकडाउन करण्याला आता विरोध होताना दिसत आहे.

मात्र या लॉकडाऊनला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचा प्रचार करण्यासाठी राजू शेट्टी आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘आधी शेतमालाला किंमत द्या, मगच लॉकडाऊन करा. ज्यांचा रोजगार बुडणार आहे त्यांना भरपाई द्या. ज्यांचा व्यवसाय बुडाला त्यांना भरपाई द्या. मग लॉकडाऊन करा. नुसताच लॉकडाऊन करतो म्हणणं योग्य नाही. त्यापेक्षा सरकारनं आम्हाला आमच्या नशीबावर सोडावं. आमचं आम्ही पाहून घेऊ.’

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी ३ वाजता बैठक…
राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.

आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याची गरज नाही; भाजपचा आरोग्यमंत्री बरळला

बिग ब्रेकींग! छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना २० जवान शहीद; मोदींनी व्यक्त केला शोक

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले आहेत महेश भट्ट?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.