मंडपातून फरार झाला नवरदेव, पाहूण्यानेच संधी साधत नवरीसोबत घेतले सातफेरे

तुम्ही अनेकदा चित्रपटात पाहिले असेल, की लग्नाच्यावेळी नवरदेव अचानक लग्न रद्द करतो आणि हीच संधी साधत कोणी तरी दुसरंच त्या नवरीसोबत लग्न करतं. आता अशीच एक घटना कानपुरमध्ये घडली आहे.

लग्नामध्ये नवरदेवाकडून असलेल्या वरातीत असलेल्या एका तरुणाने नवरीसोबत लग्न केल्याची अजब घटना घडली आहे. कानपुरच्या नरवल भागात ही घटना घडली असून सगळीकडे याच लग्नाची चर्चा सुरु आहे.

नरवल येथे एक लग्न समारंभ पार पडणार होता. नवरीवाल्यांनी सर्व तयारी करुन ठेवली होती. नवरा मुलगा पण जवळच्याच गावातला होता. वरात आली होती, पण नवरदेवच गायब झाला होता. त्यानंतर सर्वांची शोधाशोध सुरु झाली पण नंतर असे कळाले की नवरदेव कुठे गायब नाही झाला, तर तो स्वत: पळून गेला आहे.

ही गोष्ट माहिती पडताच लग्न मंडपात एकच खळबळ उडाली. नवरी मुलीच्या कुटुंबाला तर धक्काच बसला. मुलीचे असे अचानक लग्न मोडल्याने त्यांची परिस्थिती रडून रडून वाईट झाली होती.

त्यानंतर नवरीच्या कुटुंबाने ज्या पाहूण्याने हे स्थळ आणले होते, त्यांनाच गाठले. तसेच सर्व परिस्थिती सांगत अचानक उद्भवलेल्या समस्येवर उत्तर मागितले. पण लग्नात अजून एक अबज घटना घडली.

वरातीमध्ये आलेला एक तरुणच मुलीसोबत लग्न करायला तयार झाला. कुठलाही विचार न करता त्याने हा प्रस्ताव थेट नवरीच्या कुटुंबाकडे मांडला. नवरीच्या कुटुंबानेही जास्त विचार न करता मुलीचे लग्न त्या तरुणासोबत लावून दिले. हे लग्न झाल्यानंतर नवरीवाल्यांनी पळून गेलेल्या नवरदेवावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला जोरदार तडाखा; स्टेडियमची झाली अशी अवस्था; पहा फोटो
रविना टंडन झाली आज्जी, तिच्यात आणि मुलीत आहे ११ वर्षाचा फरक; जाणून घ्या पूर्ण किस्सा
बाळाच्या तोंडात खड्डा पडला, आईने घाबरून दवाखान्यात नेल्यावर डाॅक्टरांसहीत सर्वांचे हसू थांबेना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.