जुगाड! लॉकडाऊनमुळे चक्क विहीरीत लागलं लग्न, पाहा अनोख्या लग्नसोहळ्याचा व्हिडिओ

देशात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे देशावर एक मोठं संकट आलं आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन लॉकडाऊनची घोषणा करत आहे. लॉकडाऊनमध्ये कमी लोकांच्या उपस्थित लग्न, राजकीय सभा, अंत्यसंस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची नियमावली करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होतान दिसून येते. असाच एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लॉकडाऊनमुळे चक्क विहीरीमध्ये लग्न पार पडले आहे.

पीयुश सिंह यदुवंशी यांनी फेसबूक अकाऊंटवर विहीरीतील लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओंमध्ये पाहू शकता, एका खोल विहीरीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विहीरीच्या कडेला लोकं जमली आहेत. विहीरीमध्ये नवरदेवासमोर भटजी मंत्र वाचत आहे.

विहीरीच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनी तोंडाला बांधले आहे. यदुवंशी यांनी व्हिडिओला लॉकडाऊनमुळे विहीरीत केलेला विवाह असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजर्सने लॉकडाऊनमध्ये लग्न करण्यासाठी भन्नाट जुगाड केला आहे. अशी कमेंट्स केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांवर आली भयानक वेळ; कोरोनाच्या उपचारासाठी मिळत नाहीये आरोग्य सुविधा
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट? अभिषेकने केला ‘हा’ मोठा खुलासा
विराट कोहलीच्या अगोदर ‘या’ क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अनूष्का शर्मा
IPL विजेता कर्णधार वाॅर्नरवर आली वाॅटरबाॅय बनण्याची वेळ; भर मैदानात ढसाढसा रडला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.