तमिळनाडूच्या या पठ्ठ्याने लग्नासाठी विमानचं केलं बुक, अन् हवेतच बांधली लग्नगाठ; पाहा व्हिडिओ

चेन्नई | कोरोनाच्या दुसऱ्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कडक निर्बंध लावत आहेत. विवाह सोहळे, अंत्यसंस्कार कमी लोकांच्या उपस्थित करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तमिळनाडू राज्यामध्येही लॉकडाऊन केला आहे. कोरोना काळात लग्न अनोख्या तऱ्हेने लग्न केल्याचे किस्से आपण ऐकले आहेत.

अशातच जास्त लोकांच्या उपस्थित धुमधडाक्यात विवाह सोहळा करता येत नसल्याने एका जोडप्याने भन्नाट आयडिया केली आहे. या जोडप्याने चक्क एक विमानच बुक केले आणि हवेतच लग्नगाठ बांधली. सोशल मिडियावर या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चैन्नईमधील मदुराई येथील तरूण राकेशचा विवाह दक्षिणाशी  ठरला होता. सगळ्या लग्नापेक्षा काहीतरी वेगळं करून लग्न करायचं दोन्ही कुटूंबाने ठरवलं. यानंतर त्यांनी दोन तासासाठी एक विमान भाड्याने घेतले.

लग्नाला उपस्थित होणाऱ्या १६१ नातेवाईकांची कोरोना चाचणी केली. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर विमानात १६१ पाहूण्यांना बसवण्यात आले. मदुराई विमानतळावरून विमान हवेत झेपावलं. विमान मदुराई येथील मिनाक्षी अम्मन मंदिरावरून जात असताना राकेशने दक्षिणाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं अन् लग्नाच्या बंधनात अडकले.

सोशल मिडियावर या लग्नाचे व्हिडिओ फोटो व्हायरल झाले आहेत. विवाह सोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवला होता. नातेवाईकांनी नवरा नवरींनी तोंडाला मास्कही लावला नव्हता.

दरम्यान या विवाह सोहळ्याबाबत लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विवाह सोहळ्यासाठी परवानगी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. कोरोना नियमांचा भंग करून लग्न सोहळा पार पाडण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मीनाषी शेषाद्रीने ‘दामिनी’ चित्रपटानंतर एकही चित्रपट साईन केला नाही
जुही चावलाने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘तेव्हा’ मी सलमानला रिजेक्ट केले होते
काय सांगता; डॉमिनोज पिझ्झा कंपनीच्या कोट्यवधी ग्राहकांचा डेटा झाला लीक
१६० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने जात होती बुलेट ट्रेन, ड्रायव्हर चालू ट्रेन सोडून गेला टॉयलेटला…

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.